तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 17 January 2020

सेलू येथील रेल्वे पार्सल सेवा तडकाफडकी बंदसेलू, दि.१७ प्रतिनिधी :  गेल्या शंभर वर्षापासून सुरू असलेली सेलू रेल्वे स्थानकावरील पार्सल सेवा रेल्वे प्रशासनाच्या नांदेड विभागाने तडकाफडकी बंद केल्याने व्यापारी, नागरिक, उद्योजक व प्रवाशी वर्गातून प्रचंड संताप व्यक्त होत असून या प्रशासनाने पार्सल सेवा पूर्ववत सुरू न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. 
सेलू स्थानकावर नव नवीन रेल्वेला थांबा मिळत आहे. परंतु गेल्या शंभर वर्षां पासून चालू असलेली रेल्वे पार्सल सेवा अचानकच बंद केल्यामुळे बाहेरगावाहून सेलूला येणारा माल व सेलू येथुन जाणारी मालवाहतूक बंद झाल्यामुळे या परिसरातील व्यापारी, शेतकरी, विद्यार्थी व नागरिकांतून प्रचंड नाराजी आहे. मुंबई, पुणे, काकीनाडा, हैद्राबाद,भोपाळ, अमृतसर आदी ठिकाणाहून सेलूला मालाची आवक होते. तसेच येथील बरेचसे विद्यार्थी शिक्षण व नौकरीच्या निमिताने बाहेरगावी आहेत व त्यांना देखील त्यांचे पालक काही वस्तू रेल्वे पार्सल मार्फतच पाठवतात. सेलू येथे बऱ्याच वृत्तपत्राचे पार्सल देखील याच रेल्वे पार्सल द्वारेच येतात ते देखील बंद झाले आहेत. रेल्वे पार्सल सेवा त्वरित सुरू करावी अशी मागणी मराठवाडा रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष शिवनारायण मालाणी, नगराध्यक्ष विनोद बोराडे, नगरसेवक रहीमखाँ पठाण, भाऊसाहेब सोनवणे, अजित मंडलिक, नवनाथ इंगोले, आनंद बाहेती, प्रवीण माणकेश्वर आदींनी निवेदनाद्वारे रेल्वे प्रशासनाकडे केली आहे.

वार्तांकन: बाबासाहेब हेलसकर...

No comments:

Post a Comment