तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 20 January 2020

नाथरा येथील पाचव्या ग्रामिण मराठी साहित्य संम्मेलनात रानबा गायकवाड कलाभूषण पुरस्काराने सन्मानितरळी वैजनाथ (प्रतिनिधी) ः- येथील ज्येष्ठ साहित्यीक, लेखक, दिग्दर्शक, नाटककार, संपादक रानबा गायकवाड यांना श्रीनाथ मानव सेवा मंडळाच्या वतीने  पाचव्या ग्रामिण मराठी साहित्य संम्मेलनात कलाभूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
दि.17 व 18 जानेवारी 2020 रोजी नाथ्रा येथे 5 वे ग्रामिण मराठी साहित्य संम्मेलन व भव्य पुरस्कार सोहळा संपन्न झाला. या संम्मेलनाचे उद्घाटन  ज्येष्ठ साहित्यीक प्राचार्य डॉ.कमलाकर कांबळे यांच्याहस्ते करण्यात आले. संम्मेनाच्या अध्यक्षस्थानी श्रीनाथ मानव सेवा मंडळाचे अध्यक्ष डॉ.एकनाथ घ. मुंडे हे आहेत. तर प्रमुख पाहुणे म्हणुन प्रसिध्द कथाकार प्रा.भास्कर बडे, डॉ.संतोष मुंडे, बीड येथील प्रसिध्द साहित्यीक अनंत कराड, प्राचार्य विधाते, कवी रंगनाथ मुंडे, पाटोदाचे प्रा.डॉ.महादेव मुंडे, नागनाथ बडे, मुख्याधिपिका सुलेखा कराड, अ‍ॅड.शुभांगी गित्ते, व्याख्याते चंद्रकांत हजारे, पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष अनंत गित्ते, प्रशांत जोशी, रानबा गायकवाड, धिरज जंगले, धनंजय आढाव, मोहन व्हावळे, धनंजय आरबुने, जगदिश शिंदे, महादेव गित्ते, आदी मान्यवरांची उपस्थिती होती.  झेडपीचे सर, अन् कामं ढिगभर, भीमयुग, फोटोशेन, झुकती है दुनिया, लाजायचं नाय ही नाटके रंगमंचावर आली आहेत. त्यांची पाण्याखालचं पाणी, माईंड इट, फायनल तिकीट आदी लघुपट प्रर्दशित झाले आहेत. तर आत्महत्येने प्रश्न सुटत नसतात, क्रांती सुर्याच्या दिशेने, दणका, सरड्या सारखा माणुस आदी पुस्तके प्रकाशित केले झाले आहेत. त्यांना शांता शेळके राज्यस्तरीय पुरस्कार, नॅशनल फिल्म डिव्हीजन ऑफ इंडिया यांच्या वतीने विशेष पुरस्कार, गोवा फिल्म फेस्टिव्हल मधील  पाण्याखालचं पाणी या लघुपटासाठी पुरस्कार, पत्रकार संघाचे जिवनगौरव पुरस्कार, नामदेव ढसाळ साहित्य पुरस्कार, परळी पत्रकार संघाचा मुकनायक पुरस्कार मिळाला आहे. या सर्व कामाचा दखल घेवून श्रीनाथ मानव सेवा मंडळाच्या वतीने त्यांना कलाभूषण पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केला.
हा पुरस्कार मिळाल्याबद्दल ज्येष्ठ साहित्यीक आबासाहेब वाघमारे, अखिल भारतीय नाटय मराठी परिषदेचे परळी शाखा अध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी, मसापाचे शहराध्य चंदुलाल बियाणी, प्राचार्य डॉ.आर.के.इप्पर, प्रासिध्दर्थ तायडे, प्रदिप भोकरे, देविदास बोकन, निवृत्ती खंदारे, प्रा.मारोती कांबळे, प्राचार्य डॉ.बी.डी.मुंडे, प्रा.माधव रोडे, कवी केशव कुकडे, बालाजी कांबळे, विकास वाघमारे, दत्ता वालेकर, सिध्देश्वर इंगोले यांच्यासह परळी शहर व तालुका पत्रकार संघ, सिने नाट्य संघटना व आदींनी अभिनंद केले आहे.

No comments:

Post a comment