तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 18 January 2020

अभिनव विद्यालयात भगवान बाबा यांची पुण्यतिथीनिमित्त अभिवादन
परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- ज्ञान प्रबोधिनी विकास शिक्षण प्रसारक मंडळ संचलित अभिनव विद्यालय नेहरू चौक परळी येथे राष्ट्रीय संत भगवान बाबा यांच्या पुण्यतिथी निमित्त संस्थेचे अध्यक्ष  राजाभाऊ जब्दे व  संस्थेचे सचिव  परळी भूषण  साहेबराव फड  यांच्या मार्गदर्शनाखाली अभिवादन करण्यात आले या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून संस्थेचे सचिव परळी भूषण साहेबराव फड व्यासपीठावर उपस्थित होते या कार्यक्रमात  मान्यवरांच्या हस्ते  संत भगवान बाबा  यांच्या  प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी शाळेतील सहशिक्षक शत्रुघन भांगे यांनी संत भगवान बाबा यांच्याबद्दल माहिती दिली भगवान बाबांचे मूळ नाव आबाजी तुबाजी सानप प्रचलित नाव श्री संत भगवानबाबा (जन्म : २९ जुलै, इ.स. १८९६ सुपे सावरगाव घाट, पाटोदा, बीड मृत्यू : १८ जानेवारी, इ.स. १९६५  रोजी झाला
भगवानबाबांनी महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात कीर्तनाच्या माध्यमातून शैक्षणिक, सामाजिक, नैतिक व सांस्कृतिक प्रबोधन केले. भक्तिमार्ग, कर्ममार्ग व ज्ञानमार्ग यांचा त्रिवेणी समन्वय त्यांनी साधला होता. तो त्यांच्या कीर्तनातही दिसून येई. कीर्तनकार म्हणून त्यांना प्रचंड लोकप्रियता मिळाली होती. आपल्या कीर्तनांतून ते जातिभेद, धर्मभेद, अज्ञान, अंधश्रद्धा, अनिष्ट रुढी-परंपरा यांच्यावर प्रहार करीत. प्रबोधनकार्यासाठी त्यांनी मराठवाडा, विदर्भ , तेलंगना, आंध्रप्रदेश, कर्नाटकातील काही भाग व पश्‍चिम महाराष्ट्रासह उभा महाराष्ट्र पिंजून काढला. विठूनामाचा प्रचार करतानाच त्यांनी समता, बंधुता, एकता, मानवता यांसारख्या आधुनिक विचारांचा आयुष्यभर प्रचार केला. त्यामुळेच वारकरी धर्माला आधुनिक रूप देणारे संत म्हणून त्यांना ओळखले जाते. त्यांनी वार्षिक नारळी सप्ताहाची स्थापना केली.
आळंदीवरून नारायणगडावर भगवानबाबा परत आल्यानंतर त्यांच्या भेटीसाठी पंचक्रोशीतील भाविक येऊ लागले. त्याच सुमारास बंकटस्वामींच्या कीर्तन प्रसारासाठी वार्ता कानी पडल्याने त्यांनी प्रभावित होऊन समाजप्रबोधन करण्याचा निश्चय केला. भगवानबाबा भाविकांच्या आग्रहास्तव कीर्तन करू लागले.इ.स.१९१८ साली त्यांनी नारायणगड ते पंढरपूर अशी पायी दिंडी चालू केली. तेव्हापासून नारायणगडाला 'धाकटी पंढरी' म्हणतात. इ.स.१९२७ साली नाथषष्ठीनिमित्त पैठणपर्यंत दिंडी चालू केली. पुढे सात दिवस अखंड हरिनाम सप्ताह सुरू केले. सप्ताहात भजन, कीर्तन, प्रवचन, कथाकथन, हरिनामजप व गाथापारायणे होत. पहिला अखंड हरिनाम सप्ताह इ.स.१९३४ साली पखालडोह या ठिकाणी केला. भगवानबाबा नारायणगडावर असेपर्यंत १७ हरिनाम सप्ताह झाले.
भगवानबाबांचे गुरू नारायणगडाचे माणिकबाबा आजारी असल्याची बातमी भगवानबाबांना कळली तसे ताबडतोब ते नारायणगडावर आले. माणिकबाबांनी हात उंचावून त जवळ बोलवले. 'भगवान, तुझ्यावर गडाची आता सर्व जबाबदारी राहील' असे सांगितले. ज्येष्ठ शु. १३ शके १८५९, इ.स. १९३७ रोजी माणिकबाबांनी आपला देह ठेवला.भगवानबाबांवर लोभाचा आळ घेतल्यावर त्यांनी नारायणगड सोडला. खरवंडी येथील बाजीराव पाटील भगवानबाबांना धौम्यगडावर घेऊन गेले. भगवानबाबांनी आसपासच्या गावात जाऊन लोकांना वारकरी संप्रदायाकडे वळविले. अशी माहिती शत्रुघन भांगे यांनी दिली या कार्यक्रमास सर्व शिक्षक वृंद व विद्यार्थी उपस्थित होते.

No comments:

Post a comment