तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 14 January 2020

प्रजासत्ताकदिनी घडणार नृत्याविष्काराचे दर्शन !सेलू येथे खुल्या समूह नृत्य स्पर्धा

आमदार मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते उद्घाटन  

सेलू दि.१५ ( प्रतिनिधी ) : येथील नगर पालिकेतर्फे प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून रविवारी (२६ जानेवारी) शालेय विद्यार्थ्यांसाठी खुल्या समूह नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने प्रजासत्ताक दिनी सेलूतील रसिकांना अनेकविध नृत्याविष्काराचे जणू दर्शनच घडणार आहे.
विद्यार्थ्यांमधील सुप्त कला गुणांना वाव मिळवून देण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने या स्पर्धेचे सातत्याने आयोजन केले जाते. आहे. यशस्वी संघांना प्रथम पारितोषिक रोख २१ हजार रुपये , व्दितीय रोख १५ हजार रुपये, तर तृतीय पारितोषिक रोख ११ हजार रुपये आहे. याशिवाय उत्तेजनार्थ व उत्कृष्ट वेशभूषे करिता तीन संघांना पारितोषिके देण्यात येणार आहेत. 
स्पर्धेचे उद्घाटन आमदार मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते होणार आहे. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.शरद कुलकर्णी हे असतील. यावेळी उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी, तहसीलदार बालाजी शेवाळे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रकाश एकबोटे, पोलीस निरीक्षक वसुंधरा बोरगावकर,स्वच्छता दुत जयप्रकाश बिहाणी, नंदकिशोर बाहेती यांची उपस्थिती राहणार आहे. 
नगर पालिकेच्या क्रीडासंकुल परिसरात सांयकाळी साडे सहा वाजता आयोजित या स्पर्धेला रसिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन नगराध्यक्ष विनोद हरिभाऊ काका बोराडे, 
उपनगराध्यक्ष प्रभाकर सुरवसे, मुख्याधिकारी देविदास जाधव व सर्व पालिका सदस्य, कर्मचाऱ्यांनी केले आहे.

वृत्तांकन : बाबासाहेब हेलसकर

No comments:

Post a comment