तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 11 January 2020

बालाजी माध्यमिक विद्यालय सेलू (परळी) येथे युगपुरुष स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांची जयंती साजरीपरळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- मराठवाडा बहुउद्देशीय  ग्रामीण  विकास  सेवाभावी संस्था परळी वैजनाथ  संचलित आज बालाजी माध्यमिक विद्यालय सेलू (परळी) येथे युगपुरुष स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांची जयंती साजरी करण्यात आली.
यावेळी शाळेचे मुख्याध्यापक मुंडे सर यांनी राजमाता जिजाऊ व युगपुरुष स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला.
 भारतीय ज्ञान व सांस्कृतीची ओळख संपूर्ण विश्वात निर्माण करणारे सुर्यप्रमाणे तेजस्वी असे आध्यात्मिक गुरू, सर्व युवकांचे प्रेरणा स्थान स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या स्मृतीस व कार्यास विनम्र अभिवादन प्रतिकूल परिस्थितीवर मात करून अवघ्या महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना घडवणारे व त्यांच्यावर धैर्य -शौर्य -न्याय परोपकाराची शिकवण देणाऱ्या आदर्श माता राजनीति तसेच युद्धकलेत निपून असणाऱ्या वीरमाता जिजाबाई यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन आणि मानाचा मुजरा यावेळी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment