तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 21 January 2020

प्रा.विजय मुंडे यांच्या हस्ते पैलवान मुरलीधर मुंडे यांच्या सत्कार

ळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- परळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती प्रा.विजय मुंडे यांच्या हस्ते पैलवान मुरलीधर मुंडे यांना कुस्तीभूषण पुरस्कार प्रदान झाल्याबद्दल त्यांचे पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. 

    श्रीनाथ मानव सेवा मंडळ आयोजित 5 वे  ग्रामिण मराठी साहित्य संम्मेलन निमित्ताने महाराष्ट्र कुस्तिगिर परिषदेचे परळी तालुकाध्यक्ष पैलवान मुरलीधर मुंडे यांना कुस्ती क्षेत्रातील योगदानाबद्दल कुस्तीभूषण पुरस्काराने नाथ्रा येथील ग्रामिण मराठी साहित्य संम्मेलनात मान्यवरांच्या हस्ते त्यांना पुरस्काराने देऊन गौरविण्यात आले होते. त्याबद्दल प्रा.विजय मुंडे यांच्या संपर्क कार्यालयात पुष्पगुच्छ देऊन यथोचित सत्कार करण्यात आला. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक व्यंकटी गित्ते, विठ्ठल साठरे, मांडवेकर, प्रा.आदिनाथ नागरगोजे आदी उपस्थित होते. यावेळी बोलंतांना प्रा.विजय मुंडे बोलंतांना म्हणाले की, कुस्तीक्षेत्राताचे नावलौकिक करून परळी तालुक्याचे नाव असे उंचावावे तसेच ग्रामीण भागातील युवकांनी कुस्ती क्षेत्राकडे वळावे असे सांगितले. पैलवान मुरलीधर मुंडे यांनी सत्कार उत्तर देतांना म्हणाले की, या सत्काराने आणखी जोमाने काम करण्याची ऊर्जा मिळाल्याचे सांगितले.

No comments:

Post a Comment