तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 20 January 2020

तुळजाभवानी महिला ग्रुपच्या वतीने हळदी कुंकवाचा कार्यक्रम


प्रतिनिधी
पाथरी:-शहरात मकर संक्रांती निमित्त ठिकठिकाणी महिलांच्या हळदी-कुंवाचे कार्यक्रम सुरू असून या निमित्त तिळगुळ आणि एकमेकींना वानाच्या रुपात भेटवस्तू दिल्या जात आहेत. एकता नगरातील महिलांच्या तुळजाभवानी ग्रुपने सोमवारी एकत्र येत हळदी कुंकवाचा कार्यक्रम संपन्न केला.
मकरसंक्रांती नंतर जवळपास पंधरा दिवस महिलांच्या हळदी-कुंकवा सह तिळगुळ आणि वान म्हणून भेटवस्तू देत एकमेकींना शुभेच्छा दिल्या जातात . शहरातील विविध भागात दुपार नंतर महिलांची या कार्यक्रमा साठी लगबग सुरू असते. अनेक ठिकाणी आता हे कार्यक्रम महिला एकत्र येत साजरा करत असल्याने वेळेची बचत होत असल्याचे त्या सांगतात. सोमवारी एकतानगर येथील तुळजाभवानी महिला ग्रुप ने सौ छाया चिंचाने यांच्या नेतृत्वात एकत्र येत हळदी कुंकवाचा कार्यक्रम केला. या वेळी सौ आशविनी शेजूळ,सौ संतोषी शिंदे,  सौ विजयमाला कटारे, सौ पुजा कटारे, सौ वर्षा राऊत, सौ रुक्मिनीबाई दरेकर,सौ आशामती सोळंके, सौ इंदूबाई काकडे, सौ लता रणेर, सौ निलाबाई वाघमारे, सौ निकिता कदम,सौ सचिता सोनटक्के या सहभागी झाल्या होत्या.

No comments:

Post a comment