तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 20 January 2020

"वसईत एच आर एस संगीत मैफल संपन्न "


{मुंबई :अनुज केसरकर)
वसई पश्चिमेकडील मनश्री सभागृहात एच आर एस कराओके सिंगिंग हब आणि सूर म्युझिकल ईव्हेन्टस प्रेझेंट संगीतकार सचिन देव बर्मन - राहुल देव बर्मन यांच्या सदाबहार गाण्यांचा नजराणा सादर करण्यात आला . " या सुरेल संगीत मैफलीची निर्मिती , संकल्पना हेतल आशर -हितेन आशर यांची होती . या संगीत मैफलीत हेतल  , हितेन , दीपा , नविन , जोसेफ , अनिल वर्मा , ममता , सुजित , चंद्रकांत , दिपाली , अनिल पाठक , हितेश , शाबाद , शुभांगी , किशोर ,  जितेंद्र , माला , जनक , दिप्ती , जगदीश , लक्ष्मण राजे आणि उदय शिरूर ( लिम्का बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्ड फेमस शीळवादक ) या गायकांनी गायलेल्या लोकप्रिय , एका पेक्षा एक सरस ,  गाण्यांना
मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या रसिकांनी टाळ्यांच्या कडकडाटात प्रचंड प्रतिसाद दिला . विशेषतः या गायकांनी सादर केलेल्या अतिशय उत्तम, गाजलेल्या अविस्मरणीय अशा  नृत्य गीतांवर रसिकांची पावले थिरकली , त्यामुळे रसिकांनी संगीत मैफलीचा मनसोक्त आनंद लुटला .  तसेच गायक आणि शीळवादक उदय शिरूर यांनी   " चिंगारी , दिवाना लेके आया है , कहना है  " ही गाणी गाऊन आणि शीळ वाजवून रसिकांना मंत्रमुग्ध केले . या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निवेदन निवेदक  हितेन आशर यांनी केले होते . अमिन साऊंड , फोटो , व्हिडिओ , प्रशांत , विलीता , साहिल , रिद्धी यांनी संगीत मैफल यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले .

No comments:

Post a comment