तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 14 January 2020

राजमाता जिजाऊ यांचे विचार आत्मसात करणे गरजेचे-प्रा.गंगाधर शेळके

 पतसंस्थेच्या कार्यालयात राजमाता जिजाऊ जयंती उत्सवात साजरी

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-  
राजमाता जिजाऊ मॉंसाहेब यांचे विचार आजच्या महिलांनी आत्मसात करणे गरजेचे असल्याचे मत जागृती पतसंस्थेचे मार्गदर्शक तथा चेअरमन प्रा.गंगाधर शेळके यांनी व्यक्त केले.
येथील जागृती नागरी सहकारी पतसंस्थेच्या कार्यालयात आज रविवार दि.12 जानेवारी रोजी राजमाता जिजाऊ मॉंसाहेब यांच्या जयंतीनिमित्त पतसंस्थेचे मार्गदर्शक व चेअरमन प्रा.गंगाधर शेळके सर यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
आज रविवार दि.12 जानेवारी रोजी जागृती नागरी सहकारी पतसंस्थेच्या कार्यालयात राजमाता जिजाऊ मॉंसाहेब यांची जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या प्रारंभी राजमाता जिजाऊ मॉंसाहेब यांच्या प्रतिमेचे चेअरमन प्रा.गंगाधर शेळके व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले. 
कार्यक्रमास चेअरमन प्रा.गंगाधर शेळके सर यांच्यासह ऍड.अण्णासाहेब लोमटे, दाजीसाहेब लोमटे, अँड.अजित लोमटे, संस्थेचे मार्गदर्शक प्रा.गंगाधर शेळके सर ,जेष्ठ संचालक प्रा.डॉ.विजयकुमार देशमुख,  वसंतराव सुर्यवंशी, भिमसिंग लोमटे,  पाटील सर, शिंदे, जागृती पतसंस्थेचे मुख्य व्यवस्थापक प्रल्हाद सावंत,  दत्तात्रय चव्हाण, राजेश मगर यांच्यासह सर्व कर्मचारी, नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a comment