तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 17 January 2020

सत्यभामा इंग्लीश स्कूल येथे हळदी कुंकूवाचा कार्यक्रम संपन्न


वराई, दि. १७ ‌… तालुक्यातील मोजे पाथरवाला बु. येथील सत्यभामा प्रतिष्ठाण संचालित सत्यभामा इंग्लीश स्कूल मध्ये मकर संक्रांत निमित्त महिला पालक यांच्यासाठी हळदी कुंकू व तिळगूळ कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
            कार्यक्रमाचा अध्यक्षस्थानी सौ .उषा पारे या होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून अंजली बने, जनाबाई गोर्डे, सपना गोर्डे, शोभा गवारे, उपस्थित होत्या. पाहुण्यांचे स्वागत शाळेतील विद्यार्थ्यानी स्वागत गीत सादर करून केले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात सुचिता खराद यांनी मकर संक्रांतीचे महत्व सांगितले. उपस्थित महिला पालकांना शाळेचे कार्यकारी संचालक महेश चेके सर यांनी मार्गदर्शन  करतांना पारंपरिक सण -उत्सवा प्रमाणे आपण राष्ट्रीय सण देखील मोठ्या उत्साहात साजरे करून देशभक्ती अंगीकृत करावी असे मनोगत व्यक्त केले.
        कार्यक्रमास पालक गंगासागर जाधव, सुनिता पवार, सुलभा चेके, वैष्णवी पवार, अंजली चव्हाण, सत्यभामा चेके, अर्चना खोसे , काजल गोरे आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रध्दा देशमुख यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक बंडू धारकर, अपेक्षा चेके, परमेश्वर कदम, पूजा कुलकर्णी, श्रध्दा देशमुख, सुचिता खराद, भानुदास राजगे यांनी परिश्रम घेतले.

╭════════════╮
   ▌प्रतिनिधी 'सुभाष मुळे' गेवराई, बीड
--------------------------------
 'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं./व्हाॅट्स अॅप : 94 2224 3787  ▌
                   ╰════════════╯

No comments:

Post a Comment