तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 19 January 2020

नवनिर्वाचित आमदार संजय दौंड यांची आज परळी येथे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या परळी येथील निवासस्थानी भेट
परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- 
विधान परिषदेवर बिनविरोध निवड झाल्यानंतर नवनिर्वाचित आमदार संजय भाऊ दौंड यांनी आज परळी येथे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या परळी येथील निवासस्थानी भेट देऊन त्यांच्या मातोश्री श्रीमती रुक्मिणबाई मुंडे यांचे आशीर्वाद घेतले यावेळी धनंजय मुंडे, माजी मंत्री पंडितराव दौंड हेही उपस्थित होते. यावेळी प्रभू वैद्यनाथ मंदिरात वैद्यनाथचे दर्शन घेतले. 
     धनंजय मुंडे यांनीही संजय दौंड यांचा विधान परिषदेवर बिनविरोध निवड झाल्याबद्दल हार ,शाल, श्रीफळ आणि फेटा बांधून सत्कार केला यावेळी माजी मंत्री पंडितराव दौंड मार्केट कमिटीचे सभापती एडवोकेट गोविंद फड संचालक माणिक भाऊ फड जिल्हापरिषद सदस्य प्रा.डॉ. मधुकर आघाव व पदाधिकारी उपस्थित होते.

No comments:

Post a comment