तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 14 January 2020

टुनकी येथील प्राथमिक उपकेन्द्रातील आरोग्यसेविकेचे रिक्त पद भरण्याचे जि प अध्यक्षा सौ मनिषा पवार यांचे आश्वासन


संग्रामपुर [ प्रतिनिधी] तालुका आदिवासी बहुल असुन तालुक्यातील टुनकी येथे प्राथमिक उपकेंन्द्र आहे  गावाची लोक ७ हजार असुन यागावाला ७ ते ८ आदीवासी गावे लागु आहेत या प्राथमिक आरोग्य उपकेंन्द्रातील आरोग्य सेविकेचे पद दिर्घकाळापासुन रिक्त असल्याने आरोग्यसेविका अभावी महिला रुग्णाची गैरसोय होत असल्याने आरोग्य विभागाच्या दुर्लक्षामुळे टुनकी ग्रामस्थांच्या वतीने लोकशाही मार्गाने आमरण उपोषण झालीत परंतु आरोग्य सेविकेचे पद रिक्त जैसे थे होते कॉग्रेस तालुकाध्यक्ष राजेन्द्र वानखडे यांचे शिष्टमंडळ यांनी नवनिर्वाचीत जि प अध्यक्षा मनिषा पवार यांची भेट घेऊन टुनकी प्राथमिक आरोग्य उपकेन्द्रातील आरोग्य सेविकेचे पद भरण्याची मांगणी केली असता विना विलंब आरोग्य सेविकेचे पद भरण्याचे आश्वासन नवनिर्वाचीत जिल्हा परिषद अध्यक्षा मनिषा पवार यांनी दिले यावेळी कॉग्रेस ता अ राजेन्द्र वानखडे, जळगाव जा कॉग्रेस क ता अ अविनाश उंबरकार, सामाजीक कार्यकर्ते अभयसिंह मारोडे, निरंजन इंगळे आदी कॉग्रेस कार्यकर्ते उपस्थीत होते

No comments:

Post a comment