तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 14 January 2020

विधान परिषदेसाठी संजय दौंड यांचा उपमुख्यमंत्री अजीत पवार व ना.धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल


 (तिनिधी) :- विधान परिषदेतील माजी विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांच्या रिक्त जागेसाठी राष्ट्रवादीने परळी मतदारसंघातील काँग्रेसचे नेते संजय दौंड यांना उमेदवारी दिली आहे.मंगळवारी अजीत पवार यांच्या उपस्थितीत संजय दौंड यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.  विधानसभेतील संख्याबळ पाहता संजय दौंड यांचा विजय निश्चित असुन यामुळे बीड जिल्हयाला आणखी एक आमदार मिळणार आहे. तर परळी मतदारसंघात पुन्हा विधानसभा आणि विधान परिषदेचे सदस्य राहणार आहेत. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत माजी मंत्री पंडितराव दौंड आणि संजय दौंड यांनी राष्ट्रवादीला मदत केली होती, त्यावेळी स्वतः शरद  पवारांनी संजय दौंड यांना आमदारकिचा शब्द दिला होता.
राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या विधान परिषद सदस्यत्वाच्या राजिनाम्यामुळे रिक्त झालेल्या विवान परिषदेच्या जागेची पोटनिवडणूक होत आहे. यासाठी महाविकास आघाडीकडुन मंगळवारी (दि. १४) संजय दौंड यांनी उमेदवारी दाखल केली आहे. संजय दौंड हे परळी विधानसभा मतदार संघातील काँग्रेसचे नेते असुन माजी मंत्री पंडीतराव दौंड यांचे पुत्र आहेत. १९९० पासुन ते जिल्हा परिषदेच्या राजकारणात सक्रिय आहेत. तेंव्हापासून ते स्वतः किंवा त्यांच्या पत्नी कायम बीड जिल्हा परिषदेत सदस्य राहिलेले आहेत. ते सध्या महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे कार्यकारिणी सदस्य अआहेत.
परळी विधानसभा मतदारसंघात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या पंकजा मुंडे यांचा पराभव करुन राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे विजयी झाले, यात दौंड कुटुंबाची भुमिका महत्वाची राहिली. निवडणुकिदरम्यानच स्वतः शरद पवारांनी संजय दौंड यांना आमदारकिचा शब्द दिला होता. या उमेदवारिच्या माध्यमातून त्यांनी तो शब्द पाळल्याचे दिसत आहे.
२००९ मध्ये पंकजा मुंडेंनी पहिल्यांदा परळीतुन विधानसभा निवडणूक लढविली, तेंव्हापासून परळी मतदार संघातील पंकजा मुंडे विधानसभेत, तर धनंजय मुंडे अगोदर भाजपकडुन आणि नंतर राष्ट्रवादी कडुन विधानपरिषदेत असे चित्र २०१९ च्या विधानसभा निवडणुकिपर्यंत होते. आता परळीतुन धनंजय मुंडे विधानसभेवर असुन संजय दौंड यांच्या माध्यामातून पुन्हा परळी विधानसभा मतदारसंघाला विधान परिषदेवर प्रतिनिधित्व मिळणार आहे.

No comments:

Post a comment