तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 14 January 2020

चित्रकला स्पर्धेला येथील केंद्रावर विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- 
       गेल्या ३४ वर्षांची परंपरा असलेल्या चित्रकला स्पर्धेला येथील केंद्रावर विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेवेळी रंगरेषेच्या दुनियेत चिमुकले हरवून गेले.
            शहरातील जगमित्रनागा मंदिराच्या पाठीमागे असलेल्या लिटल प्लाँवर स्कूलच्या प्रांगणात रविवारी स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या.सकाळी आठ पासून स्पर्धे ठिकाणी स्पर्धक विद्यार्थी व पालक यांनी गर्दी केली होती.दुपारी साडेबारा पर्यंत चाललेल्या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी लिटल प्लाँवर स्कलचे प्राचार्य शेख बसीर, मुख्याधापीका आशा पांडे, श्री.बेंडसुरे, श्री.हत्ते, श्रीमती भोसले, सुनील मस्के, श्रीमती वळसे, श्रीमती कांबळे, गीता सोळंके, शारदा बेंडे, संध्या जगतकर, संघपाल समुद्रे आदींंनी सहकार्य केले.केंद्र प्रमुख प्रा.प्रवीण फुटके यांनी काम पाहिले.

No comments:

Post a comment