तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 21 January 2020

आनंद हॉटेलच्या माध्यमातुन परळीकरांना स्वच्छ खाद्यपदार्थांची सुविधा - प्रा.विजय मुंडे


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-
परळी शहरातील बसस्थानक परिसरात नव्याने सुरु झालेल्या आनंद हॉटेलच्या माध्यमातुन परळीकरांना स्वच्छ व स्वादिष्ट खाद्यपदार्थांची सुविधा उपलब्ध झाली असल्याचे प्रतिपादन  कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती प्रा.विजय मुंडे यांनी केले.
      प्रा.विजय मुंडे यांच्या हस्ते बसस्थानक परिसरात नव्याने सुरु झालेल्या आनंद हाँटेल या नविन फर्मचे उद्घाटन करण्यात करण्यात आले. आनंद हाँटेलचे संचालक यांनी उपस्थिती मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.  यावेळी आनंत कांबळे व पांडुरंग लोखंडे, यावेळी महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष मुरलीधर मुंडे,कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक व्यंकटी गित्ते,  विठ्ठल साखरे मांडवेकर, भागवत सलगर, मधुकर मुंडे, पिंटू मुंडे, बबलू मुंडे, गोविंद पांचाळ, नरेश गाजगुंडे, राम गंगावणे, जनार्ध बोंबले अशिष नागझरे, आदिनाथ नागरगोजे, नाथ्राराव फड  आदींची उपस्थिती होती.उद्घाटनपर भाषणात बोलताना प्रा.मुंडे म्हणाले की,परळी शहर झपाट्याने वाढत असुन या वाढत्या शहरात इतर व्यवसायाबरोबर हॉटेलिंगचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात असुन या स्पर्धेच्या व्यवसायात हॉटेल आनंद च्या माध्यमातुन स्वच्छ व स्वादिष्ट नाष्टाची सुविधा उपलब्धत झाली असल्याने परळीकरांचा चांगला प्रतिसाद मिळेल असा विश्वास व्यक्त केला.

No comments:

Post a Comment