तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 18 January 2020

शरीराच्या तंदुरूस्तीसह पर्यावरण रक्षणासाठी नियमित सायकल चालवावी


 - जिल्हाधिकारी

·        फिट इंडिया मोहिमेतंर्गत सायकल रॅली

   बुलडाणा, दि. 18  :
शरीराच्या तंदुरूस्तीकरीता नियमित्‍ व्यायाम करणे गरजेचे आहे. सायकल चालविणे हा सुद्धा व्यायामच आहे. सायकल केवळ शरीराच्या तंदुरूस्तीकरीताच नाही, तर पर्यावरणाचे संतुलन ठेवण्यासाठी उपयोगी आहे. त्यामुळे शरीराच्या तंदुरूस्तीसह पर्यावरण रक्षणासाठी नियमित सायकल चालवावी, असे आवाहन जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांनी आज केले.
   भारत सरकारच्या युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयाच्यानिर्देशानुसार जिल्हा प्रशासन, नेहरु युवा केंद्र, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, शिक्षण विभाग व जिल्हा सायकलींग असोसिएशन व सायकल प्रेमी नागरिक  यांच्या संयुक्त   विदयमाने  फिट इंडिया मुव्हमेंट तसेच राष्ट्रीय युवा सप्ताहातंर्गत जिजामाता क्रीडा व व्यापारी संकुल येथे 18 जानेवारी 2020 रोजी सकाळी 9 वाजता ‘फिट इंडिया सायकल रॅली’चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकारी सुमन चंद्रा उपस्थितांना मार्गदर्शन करताना बोलत होत्या.
   यावेळी प्रमुख अतिथी म्हणून आमदार संजयभाऊ गायकवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. गिते, पोलीस निरिक्षक श्री. कांबळे उपस्थित होते.  प्रास्ताविकात  जिल्हा क्रीडा अधिकारी शेखर पाटील म्हणाले,  शारीरिक सुदृढता, पर्यावरण संवर्धन, इंधन बचत, शारीरिक सुदृढता, वाहतूक  नियंत्रण, आर्थीक बचत इत्यादी उद्देश डोळयासमोर ठेवून  या फिट इंडिया सायकल रॅलीचे आयोजन केले आहे.  या प्रसंगी 17 देशांची सायकलवर यात्रा करणारे सायकल पटू संजय मयुरे यांचे  मान्यवरांच्या हस्ते झाडाचे रोपटे देवून स्वागत करण्यात आले.  
   याप्रसंगी श्री.वरारकर, क्रीडा अधिकारी श्री. जाधव, जिल्हा शा.शि. संघटनेचे अध्यक्ष निलेश इंगळे, शासकीय औद्योगीक प्रशिक्षण संस्था बुलडाणा येथील जयेश जोगदंड, ॲड.राजेश लहाने, आर्कीटेक जयंत सोनुने, आयएमए चे अध्यक्ष डॉ. महेर, श्री शिवाजी विद्यालयाचे शिक्षक श्री. पाटील,  भारत विद्यालयाचे शिक्षक एस.डी. भटकर, एडेड हायस्कूलचे शिक्षक आर.एन. जाधव, शारदा ज्ञानपीठचे शिक्षक श्री. औशाळकर आदी उपस्थित होते.
     तसेच वरील विद्यालयातील व आय.टी.आय. चे विद्यार्थी व इतर सायकलपट्टू, क्रीडा प्रेमी उपस्थित होते.
या वेळी अंदाजे 400 पर्यंत सायकलपटूंनी या रॅलीत आपला सहभाग नोंदविला. सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून रॅलीस प्रारंभ करण्यात आला. या सायकल रॅलीकरीता पायलट म्हणून निलेश इंगळे, रविंद्र गणेशे, सुरेश मोरे, श्री. औशाळकर,  जयेश जोगदंड, गणेश जाधव, आर.आर. धारपवार आदींनी कामकाज पाहिले. संचलन क्रीडा अधिकारी श्री. धारपवार यांनी तर आभार प्रदर्शन नेहरु युवा केंद्राचे लेखापाल अजयसिंग राजपूत यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्या करीता धनंजय चाफेकर, राष्ट्रीय युवा स्वयंसेवक भागवत ‍ मोहिते, निलेश लवंगे, साधना मोरे, सिमा सोनोने, जिल्हा सायकल असो.चे पदाधिकारी, जिल्हा क्रीडा संकुल समितीचे सुधीर मोरे, गणेश डोंगरदिवे, कृष्णा नरोटे, विनोद गायकवाड, प्रतिक मोरे, भिमराव पवार, कैलास डुडवा, श्री. माकोने, प्रशांत लहासे व प्रदीप डांगे यांनी प्रयत्न केले.  


जमील पठाण
8805381333

No comments:

Post a Comment