तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 14 January 2020

खाटीक समाजाने विविध समस्या, सर्वागिंण विकासासाठी संघटीत होऊन संघर्ष करणे काळाची गरज विश्वनाथ गोतरकरसंग्रामपुर [ प्रतिनिधी] खाटीक समाज वंशपरंमपरे नुसार वडिलो पार्जित बोकडयाचे मास विक्रिचा व्यवसाय करित आहे यात नानाविध समस्यांना खाटीक समाज बांधव तोंड देत आहेत खाटीक समाजाने विविध समस्या व सर्वागिंण विकासा साठी संघटीत होऊन संघर्ष करणे हि काळाची गरज असल्याचे असे प्रतिपादन आखिल भारतीय खाटीक समाज राष्ट्रीयमुख्य सरंक्षक विश्वनाथ गोतरकर यांनी आखिल भारतीय खाटीक समाज शाखा बुलडाणाच्या वतीने तालुक्यातील वरवट बकाल येथे आयोजीत समाज बांधवांच्या बैठकी प्रसंगी केले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वासुदेव माकोडे हे होते तर व्यासपीठावर आ भा खाटीक समाज राष्ट्रीय उपाध्यक्ष विश्राम पवार, जिल्हाध्यक्ष सागर कल्याणकर, जि उपाध्यक्ष विजय इल्लरकर, मोहनराव हिवराळे, सुनिल माकोडे, रंणजीत गंगतीरे, राजु माकोडे, सचिन माकोडे, आदीची उपस्थीती होती गोतरकर पुढे म्हणाले कि १२ राज्यात शेड्युल कॉस्ट मध्ये खाटीक समाजाला समाविष्ठ करण्यात आले तर १८ राज्यात खाटीक समाज खुल्या वर्गात आहे  शेड्युल कॉस्ट मध्ये नसल्याने खाटीक समाज मुख्यप्रवाहात नाही शेड्युल कॉस्ट मध्ये मातंग साठी अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ, चर्मकार समाजासाठी चर्मेकार महामंडळ असलेल्या खाटीक समाजासाठी शेळी, मेंडी, संशोधन खाटीक महामंडळ स्वतंत्र महामंडळाची स्थापन सरकारने करावी अशी मांगणी त्यांनी केली मटन मार्केट ट्राल्स नाही कत्तलखाने नाही त्यामुळे उघड्यावर मासविक्री करावी लागत आहे प्रशासनाच्या नाहक त्रासाचा सामना करावा लागतो तेव्हा सुविधा योग्य कत्तलखाने बांधुन ट्राल्स दुकान बांधण्यात यावे तसेच शेळी, मेंडडी संशोधन मंडळाची स्थापना करुन खाटीक समाज बांधवांनसाठी कर्जाची तरतुद केल्यास खाटीक समाजातील सुशिक्षित बेरोजगार मुख्यप्रवाहात येतील व समाजाचा सर्वागिण विकास होईल यासाठी समाज बांधवांनी संघटीत होऊन संघर्ष करणे काळाची गरज असुन आखिल भारतीय खाटीक समाजच्या वतीने लोकशाही मार्गाने आंदोलनात सहभागी होण्याचे आव्हाण शेवटी गोतरकर यानी केले 
खाटीक समाजाचे संत सजन खाटीक यांच्या प्रतिमेचे पुजन हार अर्पण मान्यवरांच्या हस्ते करुन कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली यावेळी मान्यवरांची खाटीक समाजच्या नानाविध समस्यावर समायोचीत भाषणे झालीत 
कार्यक्रम यशस्वीतेसाठी रंणजीत गंगतीरे, संतोष कल्याणकर, समाधान हिवराळे, राजु माकोडे, सचिन माकोडे, विजय कल्याणकर, निलेश गंगतीरे, महादेव हिवराळे, जर्नादन हिवराळे, विठ्ठल कल्याणकर, संगिता हिवराळे, मंगला हिवराळे , सोनु हिवराळे सह तालुक्यातील खाटीक समाज बांधवांनी प्रयत्न केले

No comments:

Post a comment