तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 20 January 2020

कृषि उत्पन्न बाजार समिती संग्रामपुरचे सभापति गजानन दाणे यांच्या विरोधातिल अविश्वास मत ठराव बारगळला


संग्रामपुर [ प्रतिनिधी] येथील कृषि उत्पन्न बाजार समिती सभापती विरुद्ध अविश्वास ठरावाच्या बाजुने आवश्यक मते नसल्याने अविश्वास दर्शक प्रस्ताव ० विरुद्ध ८ मतानी फेटाळण्यात येत असल्याचे सहाय्यक निबंधक एस पी जुमळे यांनी जाहिर केल्याने कृषि उत्पन्न बाजार समिती सभापती पदी गजानन दाणे पाटील कायम राहिले
  अविश्वास प्रस्ताव संदर्भात  चर्चेला सुरुवात झाली १८ सदस्या पैकी माजी सभापती शांताराम दाणे यांच्या सह ९ सदस्यांनी सभागृहातुन बहिर्गमन केल्याने उर्वरित ९ सदस्या पैकी १ सदस्य तथस्थ राहिला व उर्वरित ८ सदस्यांनी मतदान रुपी हातवर करून सभापती यांना समर्थन केले तर अविश्वास प्रस्तावाच्या बाजुने O मत त्यामुळे संग्रामपुर कृषि उत्पन्न बाजार समिती सभापती पदी गजानन दाणे कायम राहिले व अविश्वास प्रस्ताव फेटाळण्यात येत असल्याचे सहाय्यक निबंधक एस पी जुमडे यांनी जाहिर केले

No comments:

Post a Comment