तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 21 January 2020

अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ कडून घेतलेली कर्ज माफी करण्याची राष्ट्रीय दलित पॅंथर ची मागणी!( जिल्हाध्यक्ष डॉ रवी थोरात यांनी सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांची भेट घेऊन केली मागणी)

(विश्वनाथ देशमुख सेनगावकर)


सेनगाव/प्रतिनीधी राज्यातील मातंग समाजातील लोकांचे जीवनमान उंचावणे व त्या समाजाचा मुख्य सामाजिक प्रवाहात आणून त्यांना मानाचे  स्थान मिळावे आणि त्यांचे शैक्षणिक आर्थिक सामाजिक विकास होण्याच्या उद्देशाने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ यांच्याकडून मातंग समाजाने घेतलेली कर्ज ती  कर्ज सरसगट माफ करावी अशी मागणी राष्ट्रीय दलित पॅंथर जिल्हाध्यक्ष डॉ रवी थोरात यांनी दिनांक 15 जानेवारी रोजी मंत्रालयात सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांची भेट घेऊन केली आहे.
संपूर्ण राज्यातील मातंग समाजाची स्थिती अतिशय बिकट असून त्यामध्ये हा समाज संपूर्ण रित्या भूमिहीन या समाजाची राजकीय स्थिती नगण्य आहे या समाज समाजाचा शैक्षणिक रित्या खूप मागासलेपण आहे हा समाज केवळ अन केवळ मोलमजुरी वरच आपली व आपल्या कुटुंबाची गुजराण करतो या समाजाकडे मोठे उद्योग उभारण्यासाठी कुठलेही आर्थिक भाग भांडवल नसल्याने हा समाज इतर समाजाच्या विविध कामासाठी रोजंदारी ने जात असतो.
राज्यातील मातंग समाजाच्या हजारो तरुणांनी शेती निगडीत व्यवसाय करण्यासाठी प्रक्रिया उद्योग व शेतमाल वाहतुकीसाठी कर्ज घेतलेले आहे यामध्ये एन एस एफ डी सी मुद्दत कर्ज लघु ऋण वित योजना महिला विकास योजना भाग भांडवल योजना 50% अनुदान योजना बीज भांडवल योजना थेट कर्ज योजना इत्यादी योजनेअंतर्गत तरुणांना व्यवसाय थाटण्यासाठी व्यवसायिक कर्ज घेतले आहेत सन 2014 ते 2015 या दरम्यान राज्यातील मातंग समाजातील लाभार्थ्यांना 160 कोटी रुपयाचे कर्जवाटप करण्यात आले होते मध्यंतरी या महामंडळा अंतर्गत मोठ्या प्रमाणात घोटाळा उघडकीस आला होता त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यातील अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ हे केवळ नावालाच उरले होते यादरम्यान कुठलेही समाजोपयोगी व्यवसायिक कर्ज प्रस्तावना मंजुरी देण्यात आली नाही परिणामी समाज अनेक व्यवसायिक कर्ज योजनेपासून वंचित राहिला राज्यात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ अंतर्गत एकूण कर्ज वितरण 500 कोटीच्या आत असल्याने ते  अतिशय अल्पप्रमाणात आहे.
राज्य सरकारने शेतकऱ्याकडे असलेले हजारो कोटी रुपयांचे कर्जमाफीचा ऐतिहासिक व स्वागतही निर्णय घेतला त्याच धर्तीवर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ याअंतर्गत राज्यातील विकास वंचित असलेला मातंग समाज या समाजाकडे असलेली कर्ज ती सरसगट माफ करावीत महामंडळाच्या भाग भांडवल वाढ करून त्यांचे पुनर्वसन करावे महात्मा फुले विकास महामंडळ राज्य अपंग विकास महामंडळ वसंतराव नाईक विमुक्त व भटक्या जमाती विकास महामंडळ संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ महाराष्ट्र राज्य इतर मागास वर्गीय वित आणि विकास महामंडळ या सर्व महामंडळाची कर्जमाफी करण्याची मागणी राष्ट्रीय दलित पॅंथर जिल्हाध्यक्ष डॉ रवी थोरात यांनी राज्याचे सामाजिक न्याय विशेष सहाये मंत्री धनंजय मुंडे यांची मंत्रालयात भेटीदरम्यान लेखी निवेदनाद्वारे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मुख्यमंत्री सचिवालय यांच्याकडे केली आहे. शासनाने या वंचित जात समुहाचा न्यायिक विचाराने विचार करावा व संबंध महामंडळाचे कर्जमाफी करावी नसता राज्यातील मातंग समाज शासनाच्या विरोधात रस्त्यावर उतरून लोकशाही मार्गाने आंदोलन करेल असा इशाराही डॉ रवी थोरात यांनी आपली  प्रतिक्रिया  व्यक्त केली .

No comments:

Post a Comment