तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 20 January 2020

घाटनांदूर येथे विशेष पल्स पोलिओ मोहिमेचे जिल्हा परिषद अध्यक्षा शिवकन्या सिरसाट यांच्या हस्ते उद्घाटनघाटनांदूर (प्रतिनिधी) :- येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात विशेष पल्स पोलिओ लसीकरण चे उद्घाटन जिल्हा परिषद अध्यक्षा शिवकन्या सिरसाट यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी लातूर परिमंडळाचे आरोग्य उपसंचालक डॉ. एकनाथ माले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रामकिशन पवार, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. बाळासाहेब लोमटे, शिवाजी सिरसाट, गोविंद देशमुख, राजेसाहेब देशमुख, मच्छिंदर वालेकर, ज्ञानोबा जाधव, बाळासाहेब देशमुख, डॉ. ज्ञानोबा मुंडे, डॉ. विलास घोळवे, सी. ए. देशमुख आदींची प्रमुख उपस्थिती होती.

विशेष पल्स पोलिओ मोहिमेतंर्गत जिल्ह्यात एक हजार केंद्रातुन दोन लाखापेक्षा जास्त बालकांना पल्स पोलिओ चा डोस देण्यात येत असल्याची माहिती यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. पवार यांनी दिली. पल्स पोलिओ हा संसर्गजन्य आजार असल्याने प्रत्येक मातेने आपल्या बालकास व शेजारी राहणाऱ्या बालकास डोस दिला पाहिजे. गर्भवती महिलांसाठी मिशन इंद्रधनुष्य अभियान राबविल्या जात असून गर्भवती महिलांनी आरोग्य केंद्रात नोंद करून शंभर टक्के लसीकरण करून घ्यावे. वेळोवेळी रक्ताच्या तपासण्या करून घ्याव्यात. स्वच्छता
राखण्याचे व व्यसनमुक्त राहण्याचे यावेळी आवाहन करण्यात आले. यावेळी नवीन रुग्णवाहिका व आरोग्य केंद्रास दर्जा वाढ देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली.

No comments:

Post a comment