तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 15 January 2020

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्यअध्यक्ष वसंत मुंडे यांचा १६ जानेवारी रोजी अंबाजोगाईत जाहीर सत्कारअंबाजोगाई (प्रतिनिधी) :- 
अंबाजोगाई ही कर्मभूमी असलेल्या पत्रकार वसंत मुंडे यांची महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी बिनविरोध निलड झाली असल्यामुळे अंबाजोगाई शहरात १६ जानेवारी रोजी भव्य सत्कार करण्यात येणार असल्याची माहिती मुख्य संयोजक सुदर्शन रापतवार यांनी दिली आहे. 
     अंबाजोगाई शहरातील सर्व पत्रकारांचे मित्र असलेल्या वसंत मुंडे यांची महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या बिनविरोध अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल जेष्ठ पत्रकार सुदर्शन रापतवार, जगन सरवदे, श्रावण चौधरी आणि भाऊसाहेब गाठाळ यांनी पुढाकार घेवून व अंबाजोगाई शहरातील मान्यवर यांच्या वतीने त्यांच्या जाहीर सत्काराचे आयोजन केले आहे. 
     १६ जानेवारी रोजी सायंकाळी सहा वाजता नगर परीषदेच्या आद्यवत मिटींग हाँल मध्ये माजी मंत्री अँड. पंडीतरावजी दौंड यांच्या अध्यक्षतेखाली बीड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजकिशोर मोदी,  ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा आणि माजी आमदार पृथ्वीराज साठे यांच्या प्रमुख उपस्थितीत  पञकार वसंत मुंडे यांचा शाल, श्रीफळ व सन्मानपत्र देवून सत्कार करण्यात येणार आहे. 
  वसंत मुंडे यांनी आपल्या पत्रकारितेची सुरुवात येथून केली असून पत्रकारीतेसोबतच त्यांनी पत्रकार संघटनेच्या कामात आपले उत्कृष्ट संघटन कौशल्य दाखवले आहे. अंबाजोगाई शहरातुन बीड येथे जावून पत्रकारिता करणाऱ्या वसंत म़ुंडे यांनी बीड जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्षपद भुषवून महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघात काम करण्यास सुरुवात करुन सलग तीन वर्षे संघटनेचे कार्याध्यक्षपदी उत्कृष्ट काम केले होते. त्यांच्या या कामाची दखल घेवून संघटनेचे मुख्य संघटक संजयजी भोकरे, अध्यक्ष राजा माने व इतर पदाधिकारी यांनी वसंत मुंडे यांची संघटनेचे  अध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड जाहीर केली आहे.
    वसंत मुंडे हे सध्या लोकसत्ता या दैनिकात बीड जिल्हा प्रतिनिधी म्हणून काम करीत असून एका जिल्हा प्रतिनिधीची संघटनेच्या राज्य अध्यक्षपदी निवड होण्याची ही पहिलीच वेळ असावी. या बिनविरोध निवडी दखल घेत अंबाजोगाई शहरात वसंत मुंडे यांच्या जाहीर सत्काराचे आयोजन पत्रकार सुदर्शन रापतवार, जगन सरवदे, श्रावण चौधरी आणि भाऊसाहेब गाठाळ आणि शहरातील सर्व मान्यवराच्या  वतीने सत्कार करण्यात येणार असून या कार्यक्रमास शहरातील सर्व स्तरातील मान्यवर,  पञकार यांनी उपस्थित रहावे असे आवाहन  संयोजन समिती च्या  वतीने करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment