तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 16 January 2020

गेवराईच्या हर्षदा जाधवची 'खेलो इंडिया' स्पर्धेत निवडसुभाष मुळे..
-----------------
गेवराई, दि. १६ _ जयभवानी शिक्षण प्रसारक मंडळाच्या गेवराई येथील महिला महाविद्यालयाची विद्यार्थिनी कु. हर्षदा जाधव हिची 'खेलो इंडिया' मध्ये महिला कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
    भारत सरकारच्या क्रीडा व युवक संचालनालयाच्या वतीने राष्ट्रीय पातळीवर खेळल्या जाणाऱ्या 'खेलो इंडिया' या स्पर्धेत महिला कुस्तीस्पर्धेसाठी कु. हर्षदा जाधवची निवड झाली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने कु. हर्षदा जाधव हिने हरियाणा येथे झालेल्या कुस्तीस्पर्धेत उत्तम कामगिरी केल्यामुळे तिची 'खेलो इंडिया' या राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्याकडून निवड झाली आहे. 'खेलो इंडिया' ही राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा आसामच्या  गोहाटी येथे सुरु झाली असून या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी पहिलवान कु. हर्षदा जाधव विमानाने रवाना झाली असून या स्पर्धेत तिची कामगिरी चमकदार राहिल्यास तिला आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मिळू शकते. पहिलवान कु. हर्षदा जाधवला महिला महाविद्यालयाचे क्रीडा विभागप्रमुख प्रा. डॉ. प्रविण शिलेदार यांचे मार्गदर्शन लाभले असून तिच्याकडून महाराष्ट्राच्या क्रीडा विश्वाच्या अपेक्षा उंचावल्या असल्याचे प्रशिक्षक डॉ. प्रविण शिलेदार यांनी सांगितले.
      महिला महाविद्यालयाची विद्यार्थिनी असलेल्या कु. हर्षदा जाधव हिच्या या यशाबद्दल जय भवानी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री. अमरसिंह पंडित , सचिव श्री. जयसिंग पंडित, मा.जि.प. अध्यक्ष श्री. विजयसिंह पंडित, मंडळाचे प्रशासकीय अधिकारी श्री. प्रमोद गोरकर, महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. कांचन परळीकर, प्राध्यापक -विद्यार्थिंनी आणि शहरातील नामवंत खेळाडूंनी तिचे अभिनंदन केले आहे.

╭════════════╮
   ▌प्रतिनिधी 'सुभाष मुळे' गेवराई, बीड
--------------------------------
 'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं./व्हाॅट्स अॅप : 94 2224 3787  ▌
                   ╰════════════╯

No comments:

Post a comment