तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 19 January 2020

सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे विरोधी पक्षातील भूमिकेतून बाहेर या - संतोष हंगेस्वतःचा कुठलाही अजेंडा न देता पालकमंत्र्यांनी पहिली बैठक वाया घातली

पंकजाताई मुंडे यांनी स्वतःची दृष्टी आणि प्लॅन समोर ठेऊन जिल्हयासाठी काम केलं, इतरांना दोष दिला नाही

बीड  (प्रतिनिधी) :- दि. १८ ----- पंकजाताई मुंडे यांनी
पाच वर्षात रेल्वे, रस्ते, राष्ट्रीय महामार्ग आदी जिल्हयाच्या विकासासाठी केलेल्या कामांचा आकडा आणि निधीचा आकडा एवढा मोठा आहे तरीही किरकोळ बाबी  तुम्ही तुमची प्रवृत्ती दाखवली आहे. पाच
वर्षात पंकजा ताईंनी कधीही मागच्या पालक मंत्र्यांना दोष दिला नाही मागच्या सरकारचे वाभाडे काढले नाही स्वतःची दृष्टी आणि प्लॅन समोर ठेऊन काम केलं, याऊलट स्वतःचा कुठलाही अजेंडा न देता पालकमंत्र्यांनी नियोजन समितीची पहिलीच बैठक वाया घातली, त्यामुळे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे   विरोधी पक्षातील भूमिकेतून बाहेर या अशा शब्दांत जिल्हा परिषदेचे सदस्य तथा माजी समाजकल्याण सभापती संतोष हंगे यांनी त्यांच्या आरोपांना उत्तर दिले आहे. 

  जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना धनंजय मुंडे यांनी पंकजाताई मुंडे यांच्यावर विकास निधीवरून आरोप केले होते, त्याचे संतोष हंगे जोरदार खंडन केले आहे. पंकजाताई मुंडे यांनी जिल्हयात केलेले काम तुम्हाला डोंगर दऱ्यात फिरताना, हाय-वे वर फिरताना ,विम्याचे पैसे घेताना दिसले. तुम्हाला विकासाचं अंधत्व आहे . कोणताही आराखडा मान्य केल्यावर त्याचे सर्व पैसे रिलीज होत नसतात ते टप्प्यानेच दिले जातात हे तुम्हाला माहीत नसेल. रेल्वे, रस्ते, राष्ट्रीय महामार्ग, जलयुक्त शिवार, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या इमारती, तीर्थक्षेत्र विकास तसेच इतर योजनांचा निधी मंजूर झाला तरी तो टप्प्या टप्प्यानेच आला आणि त्यातून कामे झाली.  निवडणूक आचारसंहिता आणि प्रशासकीय यंत्रणेतील गतीचा परिणाम कामावर झाला, असे असताना धनंजय मुंडे यांनी स्वतःचा कुठलाही अजेंडा न देता पहिली बैठक वाया घातली, मागे वळून पाहण्याची त्यांची सवय गेली नाही असे हंगे म्हणाले. 

..तर विकासाच राजकारण हरवेल

पंकजाताईंनी काल गहिनीनाथ गडावर जाहीर भाषणात मोठया मनाने तुम्हाला शुभेच्छा दिल्या, यापूर्वीही ताईंनी सभेत नाव घेण्यापासून ते पुरस्कार मिळाल्या बद्दल अभिनंदन करून मोठेपणा दाखवला होता. असे असताना निवडणूकीत गलिच्छ भाषा वापरून तुम्ही  तुमच्या प्रवृत्तीच दर्शन दिलंच आहे. आता याचंच प्रदर्शन जिल्ह्यातील जनतेला होत राहणार. सुरक्षा ,सन्मान आणि विकासाचं राजकारण हरवत जाईल अशी भीती जनतेला वाटत आहे त्यामुळे बीडची जनता हवालदिल झाली आहे, सूडाच्या राजकारणाचा दुर्गंध यातुन येत आहे अशी टीका हंगे यांनी केली आहे.

No comments:

Post a comment