तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 20 January 2020

परळीचे पोलिस झोपेत बीडच्या पथकाची कल्बवर धाडपरळी वैजनाथ (प्रतिनिधी) ः- परळी शहरात अवैध धंदे राजरोस पणेचालू असल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आह.े परळी शहर आणि संभाजीनगर पोलिसांनी झोपेचे सोंग घेतल्याने अखेर जिल्हा पोलिस अधिक्षक हर्ष पोद्दार यांच्या मार्गदर्शनाखाली बीड एलसीबीच्या पथाकने परळी क्लबवर धाड टाकली आणि जुगार खेळणार्‍या पाच आरोपींवर रोख मुद्देमाल जप्त केला. बीड स्थानिक गुन्हे शाखेचे झुंबर गर्जे यांच्या फिर्यार्दाीवरुन शहर पोलिस स्टेशनला मुंबई जुगार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक पोलिस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, दिनांक 18 जानेवारी रोजी बीड स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सायंकाळी 7.20 मिनिटांनी शहरातील हमालवाडी येथे चालू असलेल्या पत्याच्या कल्बवर धाड टाकली. यावेळी त्याठिकाणी विना परवाना बेकायदेशीर तिरट नावाचा जुगार खेळणार्‍या पाच जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून रोख 11340 रुपये व चार मोबाईल किंमत 4000 रुपये असे साहित्य जप्त केले.
बीड स्थानिक गुन्हे शाखेचे झुंबर हनुमंतराव गर्जे यांच्या फिर्यादीवरुन परळी शहर पोलिस स्टेशनला संदीप त्र्यंबक वाघमारे, रवी सोपान माने, साईनाथ माने, सोनु शेषेराव कांबळे व अविनाश बाळासाहेब बळवंत यांच्या विरुध्द कलम 12 मुंबई जुगार अ‍ॅक्ट अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईने परळीत एका परळी शहर आणि संभाजीनगर पोलिसांच्या अवैध धंद्यावरील कारवाई बाबत प्रश्नचिन्हा निर्माण झाला आहे.
शहरात बेकायदेशीर अवैध धंदे या बरोबरच मोठ्या प्रमाणात गुटखा अणि वाळूचीही खुलेआम विक्री होत आहे. याकडेही पोलिस अधिक्षकांनी लक्ष देण्याची गरज आहे.

No comments:

Post a Comment