तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 19 January 2020

आज श्रीक्षेत्र गोरक्षनाथ टेकडीवर सात दिवस सप्ताहात हरिनामाचा गजर
पिपंळनेर :- बीड तालुक्यातील जिल्हा भर परिचीत आ
सणारे निसर्ग रम्य वातावरणात श्रीक्षेत्र गोरक्षनाथ टेकडी संस्थान आसुन येथे विसाव्या शतकातील महान संत ह.भ.प वै . गुरुवर्य किसन बाबा यांच्या क्रपाशिर्वादाने तसेच ह.भ.प शांतीब्रम्हा नवनाथ महाराज यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली धर्मनाथ  बीज निमित्त साधुन  सात दिवस अखंड हरिनाम सप्ताह प्रारंभ दि 19 रोजी सुरू होणार आहे
या सप्ताहात सात दिवस विविध ठिकाणचे किर्तनकार येणार आसुन सप्ताहात ज्ञानेश्वरी पारायण प्रवचन ,किर्तन, संगितभजन सार्वजनिक ,हरिपाठ, भारुड , अखंड नामस्मरणात टाळाच्या गजरात हारिनामाचा गजर होणार असून तरी श्री श्रेत्र गोरक्षनाथ टेकडी संस्थानच्या पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी या सात दिवसात होणाऱ्या अखंड हरिनाम सप्ताहात सहभागी होऊन लाभ घ्यावा असे आव्हान श्रीक्षेत्र गोरक्षनाथ टेकडी देवस्थानच्या वतीने करण्यात आले आहे तसेच दि.26 रोजी दुपारी 12ते 2 यावेळी ह.भ.प सिध्देश्वर महाराज गाडे यांचे काल्याचे किर्तन होणार असुन नंतर महाप्रसाद होईल आणि अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता होणार आहे तरी बीड तालुक्यातील भाविक भक्तांनी लाभ द्यावा असे आव्हान करण्यात येत आहे.

No comments:

Post a Comment