तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 14 January 2020

शिक्षणाशिवाय परिवर्तन अशक्य - प्रा. नामदेव शिनगारेसुभाष मुळे..
----------------
गेवराई, दि. १४ _ विद्यापीठाचा हा नामविस्तार अत्यंत संघर्षातून झालेला असून अनेकांनी आपल्या प्राणांची आहूती दिली असल्याचे सांगून शिक्षणाशिवाय सामाजिक परिवर्तन अशक्य आहे, असे प्रतिपादन प्रा.नामदेव शिनगारे यांनी गेवराईच्या महिला महाविद्यालयात केले.
      डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नामविस्तार दिनाच्या निमित्ताने जयभवानी शिक्षण प्रसारक मंडळाच्या गेवराई येथिल महिला महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतिने आयोजित कार्यक्रमात प्रा. नामदेव शिनगारे हे प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. कांचन परळीकर या होत्या. प्रा. नामदेव शिनगारे म्हणाले की, बहुजनांच्या शिक्षणासाठी आणी आस्मितेसाठी झालेलं हे बलिदान समाजाला कायम परिवर्तनाची प्रेरणा देत राहिल. या प्रसंगी बोलतांना कार्यक्रमाच्या अध्यक्षा प्राचार्या डॉ. कांचन परळीकर म्हणाल्या की, डॉ. आंबेडकरांनी समाजाला कणा दिला आणि त्यांचे नाव या विद्यापीठाला देण्यासाठी इतका दीर्घ संघर्ष करावा लागणे हे आपल्या समाजासाठी भूषणावह नक्कीच नाही. शहरी भागांतील महागड्या शिक्षणाचा उल्लेख करुन प्राचार्या. डॉ. कांचन परळीकर म्हणाल्या की, शिक्षण हे समाजातील प्रत्येक स्तरातील विद्यार्थ्यांना मिळावे, यासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी अट्टाहास केला.
     प्रारंभी डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्प वाहून अभिवादन करण्यात आले. तर या कार्यक्रमाचे प्रास्तविक आणि सूञसंचालन रासेयोच्या कार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ. कल्पना घारगे यांनी केले तर आभार प्रदर्शन रासेयोचे कार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ.  कैलास सावंत यांनी केले. कार्यक्रमास प्राध्यापक, विद्यार्थिंनी बहुसंख्येने उपस्थित होत्या.

╭════════════╮
   ▌प्रतिनिधी 'सुभाष मुळे' गेवराई, बीड
--------------------------------
 'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं./व्हाॅट्स अॅप : 94 2224 3787  ▌
                   ╰════════════╯

No comments:

Post a comment