तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 11 January 2020

नांदेड -पनवेल -नांदेड पनवेल एक्स्प्रेस रोज धावणार नांदेड


गाडी   संख्या   17614/17613 नांदेड -पनवेल-नांदेड एक्स्प्रेस आठवड्यातून सहा दिवस  धावते.

रेल्वे बोर्डाने कळविल्या नुसार गाडी संख्या 17614 नांदेड ते पनवेल एक्स्प्रेस जी आठवड्यातून  सहा दिवस धावत होती (शनिवार वगळून ), हि गाडी दिनांक 01 फेब्रुवारी 2020  पासून रोज धावणार आहे.

 तसेच गाडी संख्या 17613  पनवेल ते नांदेड एक्स्प्रेस आठवड्यातून सहा दिवस धावत होती (रविवार वगळून) , ती गाडी दिनांक 02  फेब्रुवारी 2020  पासून रोज धावणार आहे.

आदरणीय संपादक महोदयांना विनंती आहे हि बातमी  आपल्या वर्तमान पत्रात प्रसिद्ध करावी.

जनसपंर्क कार्यालय, नांदेड

No comments:

Post a comment