तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 15 January 2020

परळीत श्री राधाकृष्णजी महाराज यांच्या भागवत कथेच्या मंडपाचे पूजन
परळी वैजनाथ(प्रतिनिधी) :-   प.पू.श्री राधाकृष्णजी महाराज यांच्या श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञाचे आयोजन बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या वैद्यनाथाच्या पावन भूमीत संपन्न होणार आहे.दक्षिणमुखी मंदिराशेजारी असलेल्या हालगे गार्डन येथे हा भव्य ज्ञानयज्ञ आयोजिला आहे.याची जोरदार तयारी सुरू असून हालगे गार्डन येथे मंगळवारी विधीवत मंडप पूजन करण्यात आले.

कथेचे मुख्य यजमान नंदकिशोर जाजू यांच्या हस्ते हे मंडपपूजन करण्यात आले.या मंडप पूजनाचे पौरोहित्य त्रिंबकदेव जोशी यांनी केली.यावेळी नंदकिशोर तोतला,पांडुरंग सोनी जुगलकिशोर लोहिया,सूर्यकांत सोनी,डॉ.राजेंद्र लोंढा,सचिन दरख,श्रीकांत चांडक,बद्रीनारायन बाहेती,अशोक भाला,राजेंद्र सोनी,गिरीश मुंडडा,प्रा.बंग,प्रा.भंडारी,ओमप्रकाश तापडिया,अभयकुमार ठक्कर,मनोज काबरा,सचिन सारडा,संतोष नावंदर,चेतन सौंदळे,चंद्रकांत उदगीरकर,स्वानंद पाटील यांच्यासह परळी परिसरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांची यावेळी उपस्थिती होती.

No comments:

Post a Comment