तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 14 January 2020

पैलवान मुरलीधर मुंडे यांना कुस्तीभुषण पुरस्कार जाहिर ; सर्वस्तरातुन अभिनंदनाचा वर्षावपरळी वैजनाथ (प्रतिनिधी) ः- येथील श्रीनाथ मानव सेवा मंडळ आयोजित 5 वे  ग्रामिण मराठी साहित्य संम्मेलन निमित्ताने महाराष्ट्र कुस्तिगिर परिषदेचे परळी तालुकाध्यक्ष पैलवान मुरलीधर मुंडे यांना कुस्ती क्षेत्रातील योगदानाबद्दल कुस्तीभूषण पुरस्कार जाहिर झाला. नाथ्रा येथे होणार्‍या ग्रामिण मराठी साहित्य संम्मेलनात मान्यवरांच्या हस्ते त्यांना पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे.
परळी तालुक्यातील नाथ्रा येथे दि.17 व 18 जानेवारी 2020 रोजी 5 वे ग्रामिण मराठी साहित्य संम्मेलन व भव्य पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या संम्मेलनाचे उद्घाटन माजी कुलगुरु डॉ.जनार्धन वाघमारे यांच्या हस्ते होणार आहे. संम्मेनाच्या अध्यक्षस्थानी श्रीनाथ मानव सेवा मंडळाचे अध्यक्ष डॉ.एकनाथ घ. मुंडे हे आहेत. तर प्रमुख पाहुणे म्हणुन मराठी साहित्यीक सोपान हाळमकर, प्राचार्य डॉ.कमलाकर कांबळे, ज्येष्ठ साहित्यीक प्रा.अमर हबीब, प्रसिध्द कथाकार प्रा.भास्कर बडे, कवी प्रभाकर साळेगावकर, ज्येष्ठ साहित्यीक प्रा.मधु जामकर आदी उपस्थित राहणार आहेत.
परळी तालुक्यात मुरलीधर मुंडे यांनी पहिल्यांदाच तळेगाव येथे कुस्ती आखाडा सुरुवात करुन ग्रामिण भागातील कुस्तीपटुंना प्रशिक्षणाची सुविधा उपलब्ध करुन दिली. तसेच तालुका आणि जिल्हास्तरीय शासानाच्या कुस्ती स्पर्धामधुन तरुण मल्लांना खेळविण्यात आले. यामुळे अनेक तरुण कुस्तीपटू तयार झाले आहेत. याबरोबरच त्यांनी कुस्ती अधिवेशन आयोजित करण्यात महत्तवाची भुमिका बजावली. सध्या ते परळी तालुका कुस्तिगिर परिषदेचे अध्यक्ष आहेत. दरवर्षी हनुमान जयंती निमित्त तळेगाव येथे कुस्ती स्पर्धा आयेाजित करतात, कुस्तीपटुंचे प्रश्न सोडविण्यासाठी शासनदरबारी प्रयत्न करत असतात तसेच ग्रमिण भागातील लोप पावत चालणार्‍या या मैदानी खेळाला परत नवसंजिवनी निर्माण करुन दिल्याबद्दल नाथ्रा येथे होणार्‍या 5 व्या ग्रामिण मराठी साहित्य संमेलनात त्यांना कुस्तीभूषण पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार असल्याची संयोजकांनी दिली आहे.  तसेच यापुर्वी त्यांना समता परिषदेचा राज्यस्तरीय क्रिडा पुरस्कार, पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. या पुरस्कारासाठी निवड झाल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातुन अभिनंदन होत आहे.

No comments:

Post a comment