तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 16 January 2020

मराठा क्रांती मोर्चाचा गर्भित इशारा संजय राऊत, व जितेंद्र आव्हाड मिळतील तिथे ठोकून काढू'


बाळू राऊत प्रतिनिधी 
छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी करण्यात आल्याने त्याविषयी भगवान गोयल या लेखकाच्या विरोधातही अनेक ठिकाणी आंदोलने आणि त्यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले. हे सर्व प्रकरण ताजे असताना राजकारणी लोकांची देखील जीभ घसरली जात आहे. दोन्ही ही नेते बकाल वक्तव्य करत आहेत. यांना जनाची नाही तर मनाची लाज वाटायला हवी. तुम्ही ज्याच्या जिवावर मत मागता त्यांच्यावरच बेफिकीर वक्तव्य करत आहात. हा कुठला आहे पुरुषार्थ पणा 
मुंबई मराठी पत्रकार संघात बुधवारी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक अंकुश कदम यांनी हा इशारा दिला आहे. दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी करण्यात आल्याने त्याविषयी भगवान गोयल या लेखकाच्या विरोधातही मराठा मोर्चाकडून गंभीर इशारा देण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजांची कोणीही बरोबरी करू शकत नाही. मात्र असा प्रकार यापुढेही घडल्यास त्याची मराठा मोर्चा आपल्या शैलीत दखल घेईल, असेही कदम यांनी सांगितले. 
छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज, माजी खासदार व भाजप नेते उदयनराजे भोसले यांच्या बचावासाठी मराठा क्रांती मोर्चाने उडी घेतली आहे. उदयनराजे भोसले यांच्या विरोधात लिखाण करणाऱ्या "सामना'चे संपादक व खासदार संजय राऊत, तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते व कॅबिनेटमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात आगपाखड करत "मिळतील तिथे ठोकून काढू', असा गर्भित इशारा मराठा क्रांती मोर्चाने दिला आहे.

No comments:

Post a comment