तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 11 January 2020

कोष्टी समाजाच्या वतीने ना. धनंजय मुंडे यांचा सत्कार संपन्नपरळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांचा मंत्री झाल्याबद्दल कोष्टी समाज बांधवांच्या वतीने शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व श्री चौंडेश्वरी मातेची प्रतिमा देऊन सत्कार केला.
           मंत्री झाल्या नंतर ना. धनंजय मुंडे हे प्रथमच परळी नगरीत आले असता त्यांच्या निवासस्थानी जाऊन परळी कोष्टी समाज बांधवांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी. वैजनाथ हरेगावकर, हनुमंत हुगे, गोपीनाथ हरेगावकर, दिलीप  हरेगावकर, संपादक  राजेश साबणे, गणेश डोपरे, बालाजी नंदीकोले, एन.एस जातकर सर, मयूर  हरेगावकर, मुक्तेश्वर हरेगावकर,यांच्यासह इतर कोष्टी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

No comments:

Post a comment