तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 19 January 2020

श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञाच्या शोभयात्रेस भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहा

कथास्थळी वैद्यनाथ मंदिराची मनमोहक प्रतिकृती

आजच्या कथेत श्रीमद् भागवत महात्म्य, कथारंभ, मुंनिजिज्ञासा,श्री नारद व्यास संवाद


महादेव गित्ते 
------------------------------
परळी वैजनाथ(प्रतिनिधी) :- दि.20 - श्रीमद् भागवत महापुराण ज्ञानयज्ञाचे आयोजन देशातल्या बारा ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या प्रभू वैद्यनाथाच्या पावन भूमीत,जगद् विख्यात संत गोवत्स परम् विठ्ठलभक्त श्री. राधाकृष्णजी महाराज यांच्या पावन सानिध्यात होणार आहे.शहरातील नंदधाम हालगे गार्डन येथे सोमवार २० जानेवारी ते रविवार दि.२६ जानेवारी दरम्यान करण्यात आले असून या भव्य आयोजनाची जय्यत तयारी पूर्ण झाली आहे. 

आज भागवत कथेच्या प्रारंभी सकाळी ८.३० वाजता पारंपरिक वाद्यासह भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे.या शोभायात्रेत शहरातील विविध भजनी मंडळ, संघटना सहभागी होणार असून अभूतपूर्व अशी ही शोभायात्रा विठ्ठल मंदीर जाजुवाडी येथून प्रारंभ होऊन पुढे-आर्यसमाज मंदिर-भवानी नगर-कृषी उत्पन्न बाजार समिती-राणी लक्ष्मीबाई टॉवर-गणेशपार रोड- गणेशपार - नांदूरवेस -अंबेवेस-देशमुख पार-वैद्यनाथ मंदिर मार्गे कथास्थळी दुपारी १ वा.पोचणार आहे.यानंतर दररोज दुपारी १.३० ते सायं ६.०० वाजेपर्यंत कथावाचन विवेचन  होणार आहे.

श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ होणाऱ्या कथास्थळी भव्य असे व्यासपीठ उभारले गेले असून प्रभू वैद्यनाथ मंदिराची मनमोहक अशी हुबेहुन प्रतिकृती उभारली गेली आहे.रविवारी समिती पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली,या बैठकीत कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा घेण्यात आला.अशा या पावन प्रसंगी पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन नंदकिशोर जाजू परिवार व श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ समिती मार्फत करण्यात आले आहे.


-चौकट-

प्रथम दिनी आजच्या कथेत 

दरम्यान आजच्या कथेत प्रथमदिनी महाराजश्री श्रीमद् भागवत महात्म्य, कथारंभ, मुंनिजिज्ञासा,श्री नारद व्यास संवाद या कथेच्या भागांवर विवेचन करणार आहेत.प्रभात फेरीचा सोमवारचा मार्ग
      
प.पू.राधाकृष्णजी महाराज यांचे स्टेशन वर सकाळी ६ वा स्वागत करण्यात येईल त्यानंतर प्रभातफेरीला सुरवात होऊन महाराजांसमवेत अग्रवाल लॉज-बाजार समिती-श्रद्धा रेडिमेड- सुभाष चौक-जाजुवाडी येथे प्रभातफेरी जाईल.

No comments:

Post a comment