तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 11 January 2020

नामदार धंनजय मुंडे यांच्याकडून परळीकरांना अभूतपूर्व विकासाची अपेक्षा - अंगद हाडबेपरळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- 
             परळीचा आर्थिक कणा असलेला औष्णिक विद्युत केंद्र तसेच परळी परिसरातील अनेक विकासकामांशी संबंधित प्रश्न प्रलंबित आहेत. त्यात पंचतारांकीत सिरसाळा एमआयडीसी, राख वाहतूक, बायपास सह प्रलंबित अंबेजोगाई-परळी राष्ट्रीय महामार्गाचे रुंदीकरण, नवीन विज निर्मिती केंद्र,पिण्याच्या पाण्यासाठी कायमस्वरुपी वाँटरग्रीड योजना, जुना डाक बांगला च्या जागी शहरात नवीन शासकीय विश्रामगृह इत्यादी प्रश्न मार्गी लावण्यासाठी विशेष प्रयत्नाची आवश्यकता आहे. हे विकासकार्य नामदार तथा बीड जिल्हा पालकमंत्री भूमिपुत्र धनंजय मुंडे यांच्याकडून परळीकरांची अपेक्षा
             
      महाराष्ट्रात विज निर्मितीसाठी प्रसिद्ध असलेल्या मराठवाड्यातील एकमेव परळी येथील औष्णिक वीज निर्मिती केंद्रातून सुरुवातीला ११,०० मेगावँट विज निर्मिती केली जात होती. ती आता ७५० मेगावँट वर आली आहे.१ ते ५ क्रमांकाचे विजनिर्मिर्ती केंद्र बंद करून स्क्रँप मध्ये काढले आहेत. तर संच क्रमांक ६,७,८ मधून ७५० मेगावँट विजनिर्मिर्ती केली जात आहे. या विजनिर्मिर्ती केंद्रासाठी कोळसा व पाणी ५ युनिट साठी मंजूर करण्यात आलेले आहे. पण सध्य परिस्थितीत तीनच युनिट चालू असल्याने दोन युनिटचा कोळसा व पाणी उपलब्ध आहे. तर मोडीत काढण्यात आलेल्या संचाची जागाही उपलब्ध आहे. म्हणून याठिकाणी सुपर क्रिटीकल युनिट ६६० मेगावँट या जागेत उभे करण्यासाठी मंत्री धनंजय मुंडे यांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे. तसेच संच क्रमांक ८ च्या बाजूस संच क्रमांक ९ साठी जागा मंजूर करण्यात आलेली असून या जागेवर २५० किंवा ५०० मेगावँट चा संच उभा राहू शकतो. यास मंजूरीही मिळालेली आहे. फक्त अंमलबजावणी झालेली नाही. त्यासाठी प्रयत्नांची आवश्यकता आहे. चालू असलेले संच कायम चालू राहण्यासाठी औष्णिक विद्युत केंद्र मस्ट रनच्या श्रेणीत जाणे आवश्यक आहे.संच क्रमांक ४, ५, ६ आणि ७ साठी एकुण अधिकारी-कर्मचारी संख्या १७९८ पदे मंजुर आहेत. परंतु सद्यस्थितीला केवळ अधिकारी-कर्मचारी ९५० कार्यरत आहेत. अपुर्‍या कर्मचार्‍यांवर कामकाज चालत आहे. औष्णिक विद्युत केंद्रातून राख हे साधन महत्वपूर्ण असून या राखेपासून सिमेंट कंपनी मध्ये, रोड, नाल्या आदी मध्ये उपयुक्त आहे. तसेच परिसरात वीट भट्टी व्यवसायासाठी मोठ्याप्रमाणावर राखेचा वापर केला जातो परंतु राख वाहतूक करतांना नियमांचे पालन न केल्यामुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आहे. व्यावसायिकांनी व पोलीस प्रशासनाने वाहतूक नियमानुसार योग्यरीत्या झाकून, राख भिजवून, रस्त्यावर कोठेही न सांडता वाहतूक करणे आवश्यक आहे. त्यामुळे परळी परिसरातील पर्यावरणाचे संतुलन राखले जाईल व नागरिकांच्या आरोग्यास हानी होणार नाही यासाठी मंत्री महोदयांनी वेळीच लक्ष घालून उपाययोजना कराव्यात. येथील विजनिर्मिर्ती कमी झाल्याने रोजगारासह शहरातील बाजारपेठेवर परिणाम झाला असून मोठ्या प्रमाणावर बेरोजगारी वाढली आहे. संपूर्ण बाजारपेठ ठप्प झाली आहे. तरी, दोन नवीन संच निर्मिती साठी पाठपुरावा करून परळीचा विकास करावा. मागील ७ वर्षांपासून मराठवाड्यासाठी एकही नवीन संच मंजूर केला नाही सर्व वीज निर्मिती संच विदर्भाकडे वळविण्यात आले. आदी विकासकामांची अपेक्षा थर्मल पॉवर स्टेशन काँट्रॅक्टर्स अँड सप्लायर्स अससोसिएशन चे अध्यक्ष अंगद हाडबे यांनी केले आहे.

No comments:

Post a comment