तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 14 January 2020

शाश्वत शेतीतून लाखोंचे उत्पन्न कमावण्याची सुवर्णसंधी!३० लक्ष फळबाग लागवड शुभारंभ व भव्य फळबाग प्रशिक्षण कार्यक्रम

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- 
१० लक्ष फळबाग लागवड कार्यक्रमाला मिळालेल्या भरघोस यशानंतर आम्ही घेऊन येत आहोत श्री.मयांक गांधी सर यांनी चालू केलेली भारत विकास चळवळ, बीड, परभणी, उस्मानाबाद, लातूर या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या सेवेत ३० लक्ष फळबाग लागवड शुभारंभ व भव्य फळबाग लागवड प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात येणार आहे. शनिवार, दि.25 जानेवारी 2020 रोजी या कार्यक्रमाचा भव्य शुभारंभ करण्यात येणार आहे.
30 लक्ष फळबाग लागवड शुभारंभ प्रसंगी युवा शेतकरी उद्योजकांचा सन्मान सोहळा, अनुभवी शेतकऱ्यांच्या यशोगाथा, आकर्षक शेती उपयोगी यंत्रांचा स्टॉल, पपई आणि झेंडू स्टॉल आदी कार्यक्रमही घेण्यात येणार आहेत. 
विशेष म्हणजे पपई लागवड प्रशिक्षण-विकास नलावडे(विकास हाय टेक नर्सरी), संत्रा व मोसंबी खत,पाणी व्यवस्थापन व जोपासना-बि,एम.पाटील (विभाग प्रमुख फळबाग संशोधन केंद्र,औरंगाबाद), फळबाग लागवड तंत्रज्ञान व प्रश्नोत्तरे.श्री.नरेंद्र जोशी. वरिष्ठ शाश्त्रज्ञ कृषी विज्ञान केंद्र,अंबाजोगाई, श्री मयांक गांधी सरांचे मार्गदर्शन व पुढील वाटचाल ठरणार आहे.
या सर्व गोष्टींवर सविस्तर मार्गदर्शन आपल्याला लाभणार आहे. सतत दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या मराठवाड्यातील नागरिकांसाठी व पारंपरिक शेतीला बगल देऊन शाश्वत उत्पन्नाचे साधन असलेल्या फळबाग लागवड उत्पन्नच्या उत्तम पर्यायाला अवगत करण्याची सुवर्णसंधी आपल्याला अली आहे ती पण अल्पशा दरात. या संधीचा आपण सर्वांनी लाभ घाव्या व आपले उत्पन्न वाढ व तसेच निसर्ग संवर्धन करण्यास हातभार लावावा. दि.25 जानेवारी रोजी नाथरा येथील गोकुळदास लाहोटी यांच्या शेतात सदरील कार्यक्रम घेण्यात येणार आहे. या कार्यक्रमास सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

No comments:

Post a comment