तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 12 January 2020

परळी पत्रकारसंघातर्फे राष्ट्रमाता माँ जिजाऊ जयंती साजरी
परळी वैजनाथ(प्रतिनिधी) :- परळी पत्रकार संघाच्या वतीने लोकनेते गोपीनाथराव मुंडे पत्रकार भवन येथे राष्ट्रमाता माँ जिजाऊ यांची जयंती साजरी करण्यात आली या वेळी जेष्ठ पत्रकार प्रेमनाथ कदम व पत्रकार बाबा शेख यांच्या हस्ते माँ जिजाऊच्यां प्रतिमेस पुष्पहार घालण्यात येवुन पुजन करण्यात आले.

शहरातील लोकनेते गोपीनाथराव मुंडे पत्रकार भवन येथे पत्रकारसंघाच्या वतीने राष्ट्रमाता माँ जिजाऊ यांची जयंती साजरी करण्यात आली.या वेळी जेष्ठ पत्रकार दिलीप बद्दर,रानबा गायकवाड, पत्रकारसंघाचे तालुकाध्यक्ष अनंत गिते, मोहन व्हावळे,शेख मुकरम,महादु गिते,माणिक कोकाटे,विकास वाघमारे, काशिनाथ घुगे व युवराज गिते यांची उपस्थिती होती.
                   
दिनांक 12/01/2019रोजी लोकनेते गोपीनाथराव मुंडे पत्रकार भवन येथे पत्रकारांनी राष्ट्रमाता माँ जिजाऊ यांची जयंती साजरी केली होती व मुख्य अतिथी म्हणुन माजी उपनगराध्यक्ष आताचे नगरसेवक अयुबभाई पठाण यांना आमंत्रीत केले होते तेंव्हा त्यांनी माँ जिजाऊचीं प्रतिमा पत्रकार भवनला भेट देणार असे आश्वासन दिले होते ते त्यांनी आज पुर्ण केले असुन माँ जिजाऊचीं सुदंर प्रतिमा (फोटो) भेट म्हणुन दिला आहे.
                     
आजच्या या मंगलमयदिनी पत्रकारसंघाचे
तालुकाध्यक्ष अनंत गिते यांचे चिरंजिव 
युवराज गिते याचा वाढदिवस मोठ्या उस्ताहात शाल,पुष्पहार व पेढा भरवुन सर्व पत्रकार बांधवानी साजरा करून युवराज गिते यास पुढील जिवणाची वाटचाल आनंदमयी जावो अशा शुभेच्छा दिल्या.

No comments:

Post a comment