तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 11 January 2020

पदात बदल पण माणसात नाही; महासत्काराच्या दुसऱ्याच दिवशी धनंजय मुंडे परळीच्या रस्त्यांवर दिसले!


लोकांमध्ये जाऊन लोकांची कामे समजावून घेणारा नेता

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- दि. ११ ---------  मंत्रीपदावर विराजमान झाल्यानंतर परळी येथे भव्य दिव्य व डोळ्यांचे पारणे फेडणारे स्वागत अनुभवल्यानंतर दुसऱ्याच दिवशी ना. धनंजय मुंडे परळीच्या रस्त्यांवर लोकांमध्ये जाऊन, भेटीगाठी घेऊन लोकांची कामे, अडचणी व निवेदने स्वीकारताना दिसले. महाराष्ट्राच्या सामाजिक न्याय मंत्री व जिल्ह्याच्या पालकमंत्री विराजमान झाल्यानंतर देखील मुंडेंच्या कार्यपद्धतीत तिळमात्र बदल जाणवला नाही! आपण निवडून दिलेल्या नेत्याला पूर्वीप्रमाणेच लोकांमध्ये मिसळून काम करताना पाहून परळीकरांना नक्कीच नवल वाटलं असेल. 

परळी येथे ना. मुंडे यांचा काल (शुक्रवार दि. १०) परळी येथे भव्य नागरी सत्कार करण्यात आला. संपूर्ण परळी शहर दिवाळी प्रमाणे उत्साही व प्रकाशमान झाले होते. उभाही राहायला जागा नसलेल्या रस्त्यांवरून प्रचंड गर्दीच्या साक्षीने परळीकरांनी आपल्या भूमीपुत्राची भव्य मिरवणूक काढली होती. त्यांनतर पूर्वीचे धनंजय आणि आजचे ना. धनंजय मुंडे यांच्यात फरक जाणवेल, एसी ऑफिस, अधिकाऱ्यांचा गराडा वगैरे असेल असे वाटणे साहजिक आहे; परंतु काल मिरवणूक निघालेल्या परळीतील रस्त्यांवर दुसऱ्याच दिवशी ना. मुंडे नेहमीप्रमाणे लोकांमध्ये जाऊन भेटी गाठी घेताना दिसले. त्यांच्यातील हा विलक्षण साधेपणा व लोकांसाठी सहज उपलब्ध होण्याची वृत्ती परळीच नव्हे तर सबंध महाराष्ट्राला नेहमीच भावते! 

आज शहरातील राणी लक्ष्मीबाई चौकातील शुभम ज्वेलर्स या नवीन दालनाचे नामदार धनंजय मुंडे यांचे हस्ते उद्घाटन झाले.  त्यानंतर या चौकातील श्री तोतला यांची मोबाईल शॉपी श्री सतीश सानप यांचे मेडिकल दुकान , नाजम व भोईटे पान सेंटर या दुकानाला त्यांनी सदिच्छा भेटी दिल्या.  काल मिरणुकीत प्रचंड गर्दीमुळे राहिलेले स्वागत स्वीकारत  त्यांनी शुभेच्छाचा स्वीकार केला. यावेळी त्यांनी पानाचाही आस्वाद घेतला. यावेळी त्यांच्यासमवेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी,  ज्येष्ठ नेते सुरेश टाक  अभयकुमार ठक्कर,  विजय प्रकाश तोतला,  नंदकिशोर तोतला , सूर्यभान मुंडे, पिंटू मुंडे , आनंत इंगळे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते

कालच एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ना. मुंडेंनी पुढील पाच वर्षात निवडणुकीपूर्वी आपल्या मतदारसंघातील जनतेला दिलेला प्रत्येक शब्द पाळण्याचे आपल्यासमोर आव्हान असल्याचे स्पष्ट केले होते व त्यानुसारच आपण पुढे विकासाभिमुख कामे करू असे आश्वासनही दिले होते. त्यानंतर आज त्यांना मंत्रिपदाची कसलीही हवा न लागू देता साधेपनाने लोकांची कामे समजून घेताना पाहून आता परळी व बीड जिल्ह्यातील जनतेच्या आशा नक्कीच पल्लवित झाल्या आहेत.

शुभेच्छा व निवेदनांचे सत्र सुरूच!
दरम्यान धनंजय मुंडे यांनी मंत्रीपदाचा पदभार स्वीकारल्यापासून त्यांच्यावर सबंध महाराष्ट्रातून शुभेच्छांचा वर्षाव सुरूच आहे. शपथबद्ध झाल्याच्या अगदी पहिल्या दिवसापासून अनेकांनी मंत्री महोदयांसमोर आपले गाऱ्हाणे मांडण्यासाठी गर्दी केलेली दिसून आली. प्रत्येक ठिकाणी विविध विषयांवरील निवेदने घेऊन असंख्य लोकांनी भेटी घेतल्या आहेत. ना. मुंडे हे प्रत्येकाची भेट स्वीकारून त्यांचे निवेदन स्वतः स्वीकारतात हे विशेष! त्यांच्या कार्यालयात आणि निवासस्थानी ही हेच चित्र पाहायला मिळाले.

No comments:

Post a comment