तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 19 January 2020

बांधकाम सभापती लाईक अहेमद यांची बिनविरोध निवडफुलचंद भगत
मंगरूळपीर-नगरपरीषद मंगरुळपीरच्या विषयसमित्यांची निवडणुक पार पडली असुन बांधकाम सभापती लाईक अहेमद शफीक अहेमद यांची दि.१८ जानेवारी रोजी बिनविरोध निवड झाल्याने सर्वस्तरातुन शुभेच्छांचा वर्षाव होत असुन लोकहिताचे आणी मंगरूळपीर शहराच्या विकासासाठी सदैव काम करेन असे यावेळी लाईक अहेमद यांनी मत व्यक्त केले.
            नगरपरिषद मंगरुळपीर सभागृहात शनिवार दि. १८ जानेवारी रोजी विषय समित्यांची निवडणूक घेन्यात आली.निवडनुक अधिकारी म्हणून ऊपवाभागिय अधिकारी जयंत देशपांडे,मुख्याधिकारी मिलींद दारोकार यांच्या ऊपस्थीतीत ही निवडणूक प्रक्रीया पार पडली.यावेळी बांधकाम सभापती म्हणून लाईक अहेमद शफीक अहेमद यांची बिनविरोध निवड करन्यात आली.मंगरूळपीर शहर हे सर्वांग सुंदर व स्वच्छ शहर बनून डिजिटल शहर बनन्याला प्राधान्य देईन असे बांधकाम सभापती यांनी यावेळी सांगीतले. याप्रसंगी नगराध्यक्षासह नगरसेवकांची ऊपस्थीती होती.

फुलचंद भगत
मंगरूळपीर/वाशिम
मो.9763007835,8459273206

No comments:

Post a Comment