तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 14 January 2020

धनंजय मुंडेंची विधानपरिषदेची रिक्त जागा संजय दौंड यांना ; उमेदवारी अर्ज केला दाखल!




शरद पवार साहेबांनी पाळला शब्द; परळीला मिळणार आणखी एक आमदार, धनंजय मुंडे यांना नवा सहकारी

मुंबई (प्रतिनिधी) :-  सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या विधानसभेतील विजयानंतर त्यांच्या विधानपरिषदेत रिक्त झालेली जागा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष  खा. शरद पवार व ना. धनंजय मुंडे यांनी निवडणुकीपूर्वी दिलेल्या शब्दानुसार संजय दौंड यांना दिली असून दौंड
यांचा उमेदवारी अर्ज आज भरण्यात आला आहे.

 माजी मंत्री पंडितराव दौंड यांच्या कुटुंबात यानिमित्ताने तब्बल ३० वर्षांनी आमदारकी मिळणार आहे. 

संजय दौंड हे  ज्येष्ठ नेते व माजी मंत्री पंडितराव दौंड यांचे सुपुत्र आहेत. दोघा पिता पुत्रांनी धनंजय मुंडे यांच्या अत्यंत प्रतिष्ठेच्या लढतीत अत्यंत मोलाची कामगिरी बजावली होती. तसेच त्याचवेळी ना. मुंडेंनी शरद पवारांच्या करवी दौंड परिवाराला शब्द दिला होता, असे बोलले जाते व यानिमित्ताने तो दिलेला शब्द पवारांनी पाळला असे म्हणणे वावगे ठरणार नाही. 

दरम्यान आज (दि. १४) विधानभवनात महाआघाडीकडून संजय दौंड यांचा उमेदवारी अर्ज भरण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील, महसूल मंत्री शिवसेना नेते एकनाथ शिंदे, काँग्रेसचे मंत्री विजय वडेट्टीवार, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, माजी मंत्री तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पंडितराव दौंड काँग्रेसचे आमदार भाई जगताप, राजेश्वर आबा चव्हाण, राजेसाहेब देशमुख, गोविंद देशमुख, आदित्य पाटील यांसह आदि उपस्थित होते.

राष्ट्रवादीच्या गटाकडे असलेल्या या जागेसाठी परळी विधानसभा निवडणुकीत दौंड कुटुंबाने केलेल्या सहकार्याची परतफेड करण्याच्या हेतूने ना. मुंडेंनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींकडे आग्रह करून ही जागा  संजय दौंड यांना उमेदवारी मिळावी यासाठी यशस्वी प्रयत्न केले.

 महाविकास आघाडीचे संख्याबळ पाहता धनंजय मुंडेंना स्वतःच्या मतदारसंघातूनच आणखी एक सहकारी विधिमंडळात मिळणार असल्याचे जवळपास निश्चित मानले जात आहे.

No comments:

Post a Comment