तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 11 January 2020

परतुर शहरात रोडरोमिओंचा धुमाकूळ
मुलींच्या शिक्षणाचा पालका समोर मोठा प्रश्न...

रोडरोमिओंवर  कारवाई करा शिवसेनेचे मागणी ..

परतुर 

अॅथर शेख/आशिष धुमाळ

 तालुक्यामधून शिक्षणासाठी मुलींना ग्रामीण भागातून कॉलेज आणि  शाळा  शिक्षण घेण्यासाठी यावे लागतात. परंतु यास परतुर शहरामध्ये रोडरोमिओंचा होणारा त्रास या त्रासाला कंटाळून मुलीमध्ये व  पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेआहे.आपण म्हणतो की शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे स्त्री शिकली तर संसाराचा गाडा व्यवस्थित रीतीने पार पडू शकते तर आशा मुलींच्या शिक्षणावर रोडरोमिओंचा होणारा  अन्याय दुर्दैवी आहे.
 अशा समाजविघातक विकृतीवर कडक कारवाई  करण्याची मागणी शिव सेनेच्या शहर शाखेच्या वतीने करण्यात आली. सविस्तर माहिती अशी की कन्या हायस्कूल शाळा तसेच  लाल बहादुर शास्ञी काॅलेज आॅर्दश काॅलनी शिवाजी नगर येथुन येता जाता विद्यार्थिनीला होणारा त्रास सातत्याने दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे. मुलींला शिक्षणा पासून वंचीत राहण्याची पसंती
पालक वर्ग करत आहे.अशा लोकशाहीच्या युगामध्ये
ग्रामीण भागात  विध्यार्थीनी ना शिक्षण घेण्याची सुविधा उपलब्ध नसल्याने शहरात यावा लागते.परंतु रोडरोमिओने अक्षरशा शहरात   धुमाकूळ घातला आहे.
विद्यार्थिनीं शाळा आणि कॉलेज जाताना आणि येताना रोडवर थांबणारे रोड रोमिओ छेडण्याचा प्रयत्न करतात अश्लील भाशेत वक्तव्य करतात.यावरूनच थांबत नाही तर तर मुलींना नावानिशी आवाज देऊन थांबण्याचा प्रयत्नही केला जातो.  विद्यालयात समोर   व  कॉलेज सुटल्यावर ठिय्या मांडून है  कृत्य रोडरोमीओ कडुन करण्यात येते या कारणाने मुलीमध्ये  घबराटीचे वातावरण निर्माण झालेले आहे.
अशा विकृती विरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी पालक वर्गातून मागणी होत आहे. रोडरोमिओ यांच्यावर योग्य वेळी मुसक्या आवळल्या नाही तर भविष्यामध्ये याचा विपरीत परिणाम होऊन  मुलीला शिक्षणापासून वंचित राहण्याचं घटना घडू शकतात. स्त्री शिक्षणाला सरकार विविध प्रकारच्या सवलती देतात परंतु एकीकडे त्यांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.पाचवी ते दहावी शिक्षण घेणाऱ्या मुली आणि महाविद्यालय मध्ये शिक्षण घेणाऱ्या मुली यांचे सुरक्षा लवकरात लवकर दामिनी पथकांनी घ्यावी अशी मागणी  पालकवर्ग करीत आहे.
बहुतांश शिक्षणाला महत्त्व आहे  मुलगी शिकली तर दोन्ही घरी दिवा लावते अशी संकल्पना आपण म्हणतो परंतु त्याच मुलींना शिक्षणाबद्दल बाधा निर्माण होत असेल तर त्या शिक्षणाला  फारस महत्त्व नाही म्हणून ग्रामीण भागातून येणाऱ्या विद्यार्थिनींना सुरक्षा मिळावी हीच आजची गरज मानल्या जात आहे.
 अशी मागणी शिव से ने ने  केलेली आहे अन्यथा पालकाना नाईलाजाने मुलींना शिक्षणापासून वंचित ठेवून घरी बसावे लागेल हीच आमच्याकडे पर्याय आहे. अशा रोडरोमिओंचा बिमोड करण्यासाठी प्रशासनाने तत्काळ पाऊल उचलून रोडरोमिओंवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी शिवसेनेचे शहर अध्यक्ष दत्ता सुंरूग, दिपक कदम,अहमद चाऊस,दिपक हिवाळे,बापू घटमाळ,बंजरंग वैष्णव, माऊली राजबिंडे ,अर्जुन बिडवे ,सालमिन चाऊस संतोष आखाडे यांच्या वतीने परतुर पोलीस निरिक्षक यांना निवेदन देऊन करण्यात आली.

No comments:

Post a comment