तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 14 January 2020

मंत्री ना.धनंजय मुंडे यांचे अमोल कराड यांच्याकडून जल्लोषात स्वागत


रळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- परळी विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा राज्याचे नवनिर्वाचित सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा बीडचे
पालकमंत्री धनंजय मुंडे मंत्री झाल्यानंतर प्रथमच परळी येत आहेत. या पार्श्वभूमीवर परळीत नागरी सत्कार सोहळा व भव्य विजयी मिरवणूकीचे इंजेगावचे अमोल कराड यांनी त्यांचे  101 तोफांची सलामीदेत तसेच जेसीबीच्या सहाय्याने 101 किलोंच्या झेंडू व गुलाबाची उधळण करत जल्लोषात स्वागत केले. 
                राज्याच्या मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर व बीड जिल्हा पालकमंत्रीपदी निवड झाल्यानंतर प्रथमच परळीत आल्यानंतर शाल, श्रीफळ, फेटाबांधून पुष्पहार देऊन स्वागत केले.  परळी मतदारसंघातील आजचा नागरी सत्कार सोहळा व भव्य विजयी मिरवणूक  इतिहासातील सुवर्ण अक्षरांनी लिहून ठेवण्याचा दिवस  असल्याचे अशा शब्दांत अमोल कराड यांनी बोलतांना व्यक्त केले. परळी मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार तथा राज्याचे नवनिर्वाचित सामाजिक न्यायमंत्री ना.धनंजय मुंडे यांचा परळीत अभूतपूर्व  नागरी सत्कार सोहळा शुक्रवार  दि.10 जानेवारी रोजी आयोजन करण्यात आले होते. शिवाजी चौकातून भव्य विजयी मिरवणूक काढण्यात आली. या भव्य मिरवणूकीचे बस स्थानक रणवीर इंट्रप्रायजेस व अर्थ मुव्हर्स येथे दाखल होताच फटाक्यांची अतिषबाजी करत 101 तोफांचा सलामी देण्यात आली. तसेच जेसीबीच्या सहाय्याने 101 किलोंच्या झेंडू व गुलाबाची उधळण करत ना.धनंजय मुंडे यांचे अमोल कराड यांनी स्वागत केले. ना.धनंजय मुंडे यांच्या समवेत  आमदार, जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांसह विविध पक्षांचे नेते, पदाधिकारी उपस्थिती होते. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले आहे. जनतेच्या हिताचे हे सरकार आहे. ना.धनंजय मुंडे यांचे शेतकरी,शेतमजुर यांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी व  समाजातील बेरोजगार युवक, युवती यांना रोजगार उपलब्ध होईल. विकासाच्या अनेक संधी निर्माण होतील. बीड जिल्ह्यासह परळीच्या सर्वांगिण विकासासाठी कटिबद्ध असल्याचा विश्वास कराड यांनी केले. आपल्या लाडक्या नेत्याच्या स्वागतासाठी  परळी नगरी सजली होती. यावेळी साहेबांच्या स्वागत करत जय घोषणाबाजी करत प्रचंड गर्दी केली होती. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री व पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांचे स्वागत करतांना अमोल कराड यांच्यासमवेत सुंदरराव आंधळे पाटील, अमोल कराड, माजी सरपंच राजेश कराड, माजी उपसरपंच मुक्तराम गवळी, प्रल्हाद कराड, गजानन कराड, गोपाल कराड, निळू पाटील, विष्णू कराड, प्रभाकर कराड, मुरलीधर कराड, जनार्दन कराड,  प्रदिप कराड, शहनिक कराड, मंचक कराड, माणिक कराड , रमेश गवळी, हरिराम कराड, दतु कराड, बालासाहेब क्षीरसागर, इंजेगाव ग्रामस्थ यांच्यासह असंख्य कार्यकर्त्य स्वागत व सत्कारास मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a comment