तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 14 January 2020

स्व नितिन महाविद्यालयात भव्य ग्रंथ प्रदर्शनी


प्रतिनिधी
पाथरी:- येथील स्व नितिन महाविद्यालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवाड्या निमित्त ग्रंथालयाच्या वतीने महाविद्यालयीन विद्यार्थ्यां साठी भव्य ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन मंगळवार १४ जानेवारी रोजी करण्यात आले होते.
या ग्रंथप्रदर्शनाचे उदघाटन माजलगाव महाविद्यालयाचे उप प्राचार्य डॉ एम ए कव्हळे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी प्राचार्य डॉ राम फुन्ने हे होते तर प्रमुख उपस्थितीत प्रा डॉ जे एम बोचरे, प्रा डॉ सुरेश सामाले, प्रा डॉ निर्वळ, मराठी विभाग प्रमुख प्रा डॉ जी जे मोरे, प्रा डॉ आनंद इंजेगावकर, ग्रंथपाल कल्यान यादव हे होते. या वेळी प्रा डॉ कव्हळे यांनी मार्गदर्शन केले. अध्यक्षीय समारोप प्राचार्य डॉ राम फुन्ने यांनी केला. तत्पुर्वी मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवराय आणि ग्रंथालयाचे जनक एस आर रंगनाथन यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा डॉ जी जे मोरे यांनी केले. तर आभार ग्रंथपाल कल्यान यादव यांनी मानले. तर सुत्र संचलन पद्मजा नांदेडकर या विद्यार्थीने केले. या वेळी ग्रंथालयातील ग्रंथ संपदा विद्यार्थ्यांनी पाहिली आणि मुक वाचन केली. या कार्यक्रमा साठी महाविद्यालयातील प्राध्यापक,शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संखेने उपस्थीत होते. ग्रंथ प्रदर्शनाच्या यशस्वितते साठी किरण घुंबरे, सतिष काळदाते, चव्हाण यांनी परिश्रम घेतले.

No comments:

Post a comment