तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 14 January 2020

लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयाच्या वतीने तालुक्यातील मिरवट येथे राष्ट्रीय सेवा योजनेचे युवती विशेष शिबीर संपन्नपरळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-
             येथील लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयाच्या वतीने तालुक्यातील मिरवट येथे राष्ट्रीय सेवा योजनेचे युवती विशेष शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबीराच्या सहाव्या दिवशी महिला सशक्तीकरण व भारत या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.यास मोठा प्रतिसाद मिळाला.
           या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा.डॉ. खिल्लारे, प्रमुख वक्ते प्रा.डॉ. विनोद जगतकर, प्रा.डॉ. कुलकर्णी, प्रा. डॉ. रोडे उपस्थित होते. प्रारंभी राष्ट्र संत गाडगे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना प्रा.जगतकर यांनी सांगितले की, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी महिलांचा सन्मान केला.महिला सशक्त असेल तरच देश सशक्त होवू शकतो,दोन पुस्तके कमी वाचा पण शारीरिक दृष्ट्या सशक्त बना असे विचार यावेळी प्रा. जगतकर यांनी मांडले. तर अध्यक्षीय समारोपात प्रा. खिल्लारे यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांनी वाचन केले पाहिजे. व आपल्या पायावर उभे राहून खंबीर बनले पाहिजे. प्रास्ताविक प्रा.डॉ. गुट्टे यांनी केले. यावेळी प्रा.डॉ. जोशी, प्रा.डॉ. पाध्ये, प्रा. शहाणे यांच्या सह विद्यार्थी, गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a comment