तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 15 January 2020

श्रीकृष्णनगर येथील अखंड हरिनाम सप्ताहाची आज सांगता


ह.भ.प. गणेश महाराज जाधव यांचे काल्याचे कीर्तन

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- 
     श्रीकृष्णनगर येथे आयोजित करण्यात आलेल्या अखंड हरिनाम सप्ताह, श्रीराम कथा व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याची आज सांगता असून यानिमित्त ह.भ.प. गणेश महाराज जाधव यांचे काल्याचे कीर्तन होणार असून सप्ताहभर चालू असलेल्या विविध धार्मिक कार्यक्रमांची सांगता होणार आहे.
परळी -अंबाजोगाई रोडवर असलेल्या या गावात शुक्रवार दि.१० जानेवारी ते गुरुवार दि.१६ जानेवारी या कालावधीत अखंड हरिनाम सप्ताह व श्रीरामकथा आयोजित करण्यात आली होती यात ह.भ.प. रामेश्वर महाराज भोजने (वेदांत सत्संग समिती आळंदी देवाची) यांच्या रसाळ वाणीतून श्रीराम कथा ऐकावयास मिळाली आहे. 
      सदरील अखंड हरिनाम सप्ताहाची आज सांगता असून यात  ह.भ.प. गणेश महाराज जाधव परतुरकर यांचे काल्याचे कीर्तन दुपारी 1 ते 3 दरम्यान होणार असून  त्यानंतर महाप्रसादाने या धार्मिक कार्याची सांगता होणार आहे तरी या सर्व कार्यक्रमाचा भाविक भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन श्रीकृष्णनगर ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे .

No comments:

Post a Comment