तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 16 January 2020

परळीत सीसीटीव्हीव्दारे होणाऱ्या वाहनधारकांची अडवणूक थांबवा- जनक्रांती सेनेचे महादेव गित्तेपरळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- परळी पोलिसांनी कुठल्याही प्रकारचे नो पार्किंगचे बोर्ड किंवा दिशादर्शक फलक न लावता वाहनांनावर कँमेराव्दारे होणाऱ्या कारवाई व दंड तात्काळ बंद करावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा जनक्रांती सेनेचे महादेव गित्ते यांनी केले आहे. शहरात पोलिसांनी आगोदर दिशादर्शक फलक बसवावेत नंतर आँनलाईन खटले टाकून दंड वसूल करावा अशी मागणी देखील गित्ते यांनी केली. 

     याबाबत अधिक माहिती अशी की, परळी शहर पोलिस ठाण्याकडून वाहतुकीवर आळा घालण्यासाठी शहरातील ठिकठिकाणी बसविण्यात आलेल्या कँमेरा व्दारे बिशस्त वाहनांवर लगाम घालण्यासाठी अशा पध्दतीने कारवाई सुरू आहे.  विविध प्रमुख चौक आणि रस्त्यावर पोलिस प्रशासनाने बसविलेले कॅमेरे आता गाडयांचे फॅन्सी क्रमांक, ट्रिपल सिट, भरधाव वेग, रॉंग साईड जाणे, अशा विविध गोष्टींवर केंद्रित करण्यात आला आहे. दरम्यान शहरामध्ये याप्रकारची कारवाई करण्यात येणार आहे अशी बोर्ड किंवा बँनर , दिशादर्शक फलक न लावताच पोलिसांनी वाहनचालकांची दिशाभूल करून दंड वसूल करण्याचा महाप्रताप सुरू आहे. यामुळे पोलिस ठाण्याचा कारभार सरळसरळ भोंगळा असल्याचे दिसत आहेत. चोर सोडून सन्यशाला पकडण्याचा डाव पोलिस करीत आहेत. पोलिस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंदे बोकाळलेले असतांना तिकडे लक्ष केंद्रित न करता वाहतूक करणाऱ्या वाहनाचाकांचा दंड वसूल करण्यात मग्न असल्याचे दिसत आहेत. जिल्हा पोलिस अधीक्षक यांनी वैयक्तिक लक्ष देऊन संबधित विभागाची चौकशी करावी. आगोदर दिशादर्शक फलक लावावेत मगच आँनलाईन खटले दाखल करावेत अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा जनक्रांती सेनेचे महादेव गित्ते यांनी दिली आहे.

No comments:

Post a Comment