तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 11 January 2020

भारतीय महिलांशी विवाह करणारे परदेशी क्रिकेटपटू


         लग्नबंध हे परमेश्वराने स्वर्गातच बांधले असतात. फक्त भूतलावर त्याचे विधिवत गठण केले जाते. मग ती व्यक्ती कुठल्याही धर्माची,देशाची असू शकते. या प्रकारे लग्न बंधनात अडकणारे अनेक जण आहेत. परंतु यात काही क्रिकेटपटू असणे ही बाब सर्वांच्या कुतुहलाचा विषय बनते. अशाच काही विदेशी  क्रिकेटपटूंशी विवाह करणाऱ्या भारतीय महिलांची माहीती आपण या लेखात वाचू या.
                 शॉन टेट : -ब्रेट ली नंतर सर्वात जलद चेंडू फेक करणारा हा ऑस्ट्रेलियन गोलंदाज. त्याच्या कालखंडात तो ऑस्ट्रेलियाचा एक प्रमुख गोलंदाज म्हणून नावारूपाला आला होता. या शॉन टेटने १२ जून २०१४ रोजी भारतीय मॉडेल माशूमसिंग हिच्याशी विवाह केला. शॉन टेटने माशूमला पॅरीसमध्ये लग्नाची मागणी घातली होती. चार वर्ष प्रेम प्रकरण रंगले. त्यानंतर ते लग्नबंधनात गुंफले.
                ग्लेन टर्नर: - हा न्यूझिलंडचा अतिशय गुणवान फलंदाज व माजी कर्णधार. सन १९७० ते १९८३ या कालखंडात तो न्यूझिलंड संघाचा घटक होता. ग्लेेन मेटलँड टर्नर या न्यूझिलंडच्या प्रतिथयश फलंंदाजाने पंजाबच्या लुधीयाना येथे शिख घराण्यात जन्मलेल्या सुखविंदर कौर या महिलेशी विवाह केला. लग्नानंतर सुखी टर्नर नामकरण झालेली सुखविंदर कौर न्युझीलंडमधील ड्यूनेडीन शहराची महापौर
मधील बनली होती.या जोडप्याला दोन मुलेही आहेत.
          माईक ब्रेअर्ली : - हा इंग्लंडचा तत्कालीन सर्वोत्तम फलंदाज व जगातील आजवरचा अतिशय हुशार व चालाख कर्णधार. विरोधी कर्णधाराची प्रत्येक चाल हाणून पाडण्यात वाकबगार ! विपक्षी खेळाडूंनाही स्वतःच्या जाळ्यात सहज घेेरायचा. परंतु भारतीय सुंदरी मना साराभाई हिने माईकच्या दोऱ्या अचूक ओळखल्या व आपल्या प्रेम पाशात ओढले. सन १९७६  - ७७ मध्ये या जोडीची पहिली भेट झाली. त्याचे रूपांतर प्रेमात व नंतर लग्नात झाले.
               झहीर अब्बास : - हा पाकिस्तानचा माजी कर्णधार व उत्कृष्ठ फलंदाज. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये १०० शतके करणारा पाकचा पहिला फलंदाज. सन १९८० मध्ये रीटा लुथ्रा नावाच्या भारतीय महिलेशी त्याची इंग्लंडमध्ये प्रथम भेट झाली. त्यानंतर आठ आठ वर्षांनी त्यांनी लग्न केले. या जोडप्याला समीना नावाची कन्याही झाली.
                मुथय्या मुरलीधरन : - हा श्रीलंकेचा विश्वविक्रमी गोलंदाज. गोलंदाजीतील अनेक पराक्रम या बहाद्दराने केले. अनेक फलंदाजांना आपल्या फिरकीच्या जाळयात घेरले.परंतु हा फिरकीपटू भारतीय युवती माधीममार मुर्ती हिच्या चक्रात अडकला.२१ मार्च २००५ मध्ये त्यांनी लग्न केले. त्या दांपत्याला एक मुलगाही आहेे.
                 शोएब मलिक : - हा पाकिस्तानचा माजी कर्णधार. चांगल्या पैकी फलंदाज व उपयुक्त फिरकी गोलंदाज. भारतीय टेनिस तारका सानिया मिर्झाशी सन २०१o मध्ये विवाहबद्ध झाला. या जोडप्याला एक मुलगाही आहे. परदेशी क्रिकेटपटू व भारतीय महिला असे विवाह करणाऱ्या जोडप्यात हीच एकमेव जोडी सुपरिचीत आहे.

                  हसन अली : - हा पाकिस्तानच्या संघातील वेगवान गोलंदाज. त्याने भारतीय युवती शमीया आरजू हिच्याशी २० ऑगष्ट २०१९ रोजी दुबईत लग्न केले. २६ वर्षीय शमीयाचे कुटुंब दिल्ली येथे राहते. तिने फरीदाबाद येथील मानव रचना विद्यापीठातून बीटेक (एरोनॉटिकल) पदवी घेतली आहे. ती अमिराती एअरलाईनमध्ये उड्डाण अभियंता आहे. यापूर्वी तिने जेट एअरवेजमध्ये काम केले आहे. शमीयाचे वडील लियाकत अली हरियाणाच्या बीडीपीओच्या पदावरुन सेवानिवृत्त झाले आहेत. तर शामियाचे आजोबा भारत पाकिस्तान फाळणीनंतर भारतातच राहिले. मात्र त्यांचे भाऊ तुफैल पाकिस्तानात निघून गेले. तुफैल यांचे कुटुंब पाकिस्तानच्या कसूर जिल्ह्यात राहते. त्यांनीच शमीयाचे लग्न हसनबरोबर ठरवले होते.

                  या व्यतिरिका अनेक बॉलीवूड चित्रपट तारकांनी परदेशी क्रिकेटपटूंशी विवाह केले आहेत. परंतु प्रस्तुत लेखात आपण केवळ सामान्य भारतीय युवतींनी परदेशी क्रिकेटपटूंशी केलेल्या विवाहासंदर्भात माहीती बघीतली आहे.

लेखक : - दत्ता विघावे 
क्रिकेट समिक्षक.
इंटरनॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट, मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल प्रतिनिधी भारत.Email:  dattavighave@gmail.comमोबाईल. ९०९६३७२०८२.

No comments:

Post a comment