तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 18 January 2020

अंनिसच्या वतीने परळीत ह.भ.प.श्यामसुंदर महाराज सोन्नर यांचे संविधानावर प्रवचन

 वैजनाथ (प्रतिनिधि) :-  अंधश्रध्दा निर्मुलन समिती,शाखा परळीच्या वतीने "संविधान बांधिलकी महोत्सव"
अंतर्गत प्रसिध्द किर्तनकार,पत्रकार,प्रवचनकार ह.भ.प.श्यामसुंदर सोन्नर,मुंबई यांचे दि 21जानेवारी2020रोजी ,सांय. ठिक 5:00वा "भारतीय संविधान आणि संताची विचारपंरपंरा"या विषयावर येथील कै.लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालय,येथे प्रवचन आयोजित करण्यात आले असुन ,या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ साहीत्यिक आबासाहेब वाघमारे गुरुजी उपस्थित राहणार आहेत.
        संविधान बांधिलकी महोत्सव महाराष्ट्रभर अंनिसच्या वतीने साजरा केला जातोय,त्याच श्रृंखलेतील परळीत होत असलेला कार्यक्रम असल्याचे एका प्रसिध्दी पत्रकात सांगण्यात आले आहे.
श्यामसुंदर महाराज सौन्नर हे संविधान जागृती करण्यासाठी संबंध महाराष्ट्रभर किर्तनातुन,प्रवचनातुन जागृतीचे काम अंनिसच्या वतीने करित आहेत.या अनोख्या व आकर्षक पध्दतीने संविधान जागृतीच्या कार्याला लोकांचा भरभरुन प्रतिसाद मिळत असल्याचे महाराजांनी अंनिस कार्यकत्यांना सांगितले आहे.
या राष्ट्रिय कार्यक्रमाला परळी शहरातील सर्व भारतीय नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन परळी अंनिसच्या सुकेशनी नाईकवाडे-राॅय,विकास वाघमारे,प्रा विलास रोडे,प्रा दासु वाघमारे,रानबा गायकवाड,प्रेमनाथ कदम,अशोक मुंडे,वैजनाथ कळसकर,शौकत पठाण सर,भगवान
 साकसमुद्रे,जी एस सौंदळे सर, राहुल घोबाळे,गोपाळ आघाव,प्रा दशरथ रोडे,नवनाथ दाणे, आकाश सावंत यांनी केले आहे

No comments:

Post a Comment