तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 11 January 2020

मराठवाड्यात प्रथमच नांदेड येथे भव्य वासवी माता मंदिर. --महाराष्ट्र आर्यवैश्य महासभाध्यक्ष नंदकुमार गादेवारजिंतूर
आर्यवैश्य कुलस्वामिनी आई वासवी कन्यका परमेश्वरी मातेच भव्य मंदिर नांदेड येथील वासवी भवन परिसरात मराठवाड्यात प्रथमच निर्माण करण्यात महासभेला यश आलं आहे अशी माहिती महासभेचे प्रसिद्धी प्रमुख सर्वश्री वीजय बंडेवार,  डॉ विजय निलावार ,प्रदीप कोकडवार ह्यांना दिली.केवळ आर्यवैश्य समाजातील  देणगीदारांच्या देणगीतून हे भव्यदिव्य मंदिर उभारण्यात आल आहे. २९ जानेवारीला प्राणप्रतिष्ठा व कलशारोहन प.पू.गुरुवर्य महेश महाराज जिंतूरकर,प.पू.श्री भास्कराचार्य महाराज बासर संस्थान,प.पू.श्री एकनाथ महाराज कंधारकर, प.पू. महेश महाराज शेवाळकर,ह्यांच्या मार्गदर्शन आणि सहभागाने विधिवत संपन्न केल्या जाणार आहे.कार्यक्रमात माजी मंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार आणि सौ सपनाताई मुनगंटीवार ह्यांच्या हस्ते पहिली महाआरती होणार आहे अशी माहिती अध्यक्ष नंदकुमार गादेवार सचिव गोविंद बिडवई,कोषाध्यक्ष सुभाष कन्नावार,बांधकाम समितीचे अध्यक्ष भानुदास वट्टमवार,ह्यनी दिली.ह्या प्रसंगी महाराष्ट्र, आंध्र, तेलंगना, कर्नाटक,आदी प्रदेशातील   आर्यवैश्य बंधू भगिनीआणि समाज अंतर्गत च्या विविध संस्था, संघटना सहभागी होणार आहेत अशी माहिती देण्यात आली.ह्या सोहळ्यात तन, मन,धनाने सहभागी होऊ इच्छिणाऱ्या भक्तभाविकानी महासभेच्या सिडको नांदेड येथील मुख्य कार्यालयाशी संपर्क साधून सेवेची संधी घ्यावी अस आवाहन महाराष्ट्र आर्यवैश्य महासभेच्या सर्व पदाधिकारी,सर्व समित्यांचे सदस्य,ह्यनी केली आहे.२७ जानेवारीला सकाळी ९.३०ते रात्री ९दरम्यान शांतीपाठ, गणेशपूजन,पुण्याहवाचन,ब्राम्हणवरण, देवतास्थापणा, जलाधिवास, शय्यादिवा स,पुष्पदिवास,२८ला शांतीपाठ,स्थापितदेवता पूजन,अग्निस्थापणा, नवग्रहहोम,पर्यायहोम२९ला शांतीपाठ,देवताहोम,प्राणप्रतिष्ठा व कलशारोहन,पूर्णाहुती, महाआरती व महाप्रसाद यजमान आणि सर्व आर्यवैश्य भक्त भाविकांच्या सहभागाने संपन्न होणार आहे.सर्व संबंधितांना विविध माध्यमांचा वापर करून निमंत्रण देण्याची सुरुवात झाली असून सर्वांनी सहभागी व्हावे अशी विनंती महासभेने केली आहे.राज्यातील आर्य वैश्य समाजातील मंडळींनी सहकुटुंब सहभागी व्हावे अशी महासभेच्या वतीने दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात आवाहन केलं आहे

No comments:

Post a comment