तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 18 January 2020

भाजपा तालुकाध्यक्ष पदी निळकंठ चाटे यांची निवड करावी - धर्मा मेंडके


   
परळी वैजनाथ (प्रतिनिधी)  :-  भारतीय जनता पार्टीची बीड जिल्हा, परळी तालुका नवनिर्वाचित कार्यकारणी निवडली जाणार आहे. परळी भाजपा तालुकाध्यक्ष पदी कतृव्य निष्ठ कार्यकर्ते निळकंठ चाटे यांची निवड करण्यात यावी अशी मागणी सिरसाळा येथील युवक धर्मा मेंडके व सहकारी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे. सद्या राजकिय परिस्थिती पाहता परळी भाजपाला नवीन उमदा, धडाडीच्या कार्यकर्त्याची गरज आहे. निळकंठ चाटे यांची प्रतिमा जनमानसात आदरयुक्त आहे. विशेषतः युवक वर्ग खुप मोठ्या प्रमाणात चाहता आहे. युवकांची फौज बाधंणी भाऊनी केली आहे. सामान्य जनतेचे कोणतेही काम असो प्राधान्याने सोडवण्यासाठी निळकंठ चाटे सदैव तत्पर असतात. भाजपा तालुकाध्यक्ष पदी निवड झाल्यास भाजपला एक नवे बळ निळकंठ चाटे यांच्या रुपाने मिळेल. म्हणून भारतीय जनता पार्टीच्या परळी तालुका अध्यक्ष पदाची धुरा निळकंठ भाऊ चाटे यांच्या कडे द्यावी अशी मागणी युवक कार्यकर्ते धर्मा मेंडके यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.

No comments:

Post a Comment