तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 14 January 2020

विद्यापीठ नामविस्तार वर्धापन दिनाच्या निमित्ताने प्रा. टी.पी. मुंडे यांनी केले बाबासाहेबांना अभिवादन


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- 
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नामविस्तार दिनाच्या निमित्ताने आज लोकनेते प्रा .टी.पी. मुंडे सर यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन केले.
   भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा 26 वा नामविस्तार वर्धापन दिन आज परळी ते उत्साहात साजरा करण्यात आला लोकनेते प्रा. टी.पी. मुंडे सर यांनी सकाळीच रेल्वेस्टेशन परिसरातील डॉ बाबासाहेबांच्या पुर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
    यावेळी ऍड संजय जगतकर, जि. प .सदस्य प्रदीप भैया मुंडे, अंगद जगतकर, शिवा जगतकर, रवी रोडे ,गौतम समिंदरसवळे, भास्कर रोडे, विलास जगतकर, साहेबराव कसबे ,विकास जगतकर ,रमेश मोरे ,राहुल साळवे ,संजय साळवे, आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments:

Post a Comment