तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 17 January 2020

दिव्यांगावर मात करून व्यवसाय करणाऱ्या सय्यद सुभान यांचे कार्य कौतुकास्पद-डॉ. संतोष मुंडे

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-  दिव्यांगावर मात करत जिद्द आणि कष्टाच्या बळावर स्वःतचा हाँटेल व्यवसाय करणाऱ्या सय्यद सुभान यांचे कार्य कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तथा अपंगाचे कैवारी डॉ. संतोष मुंडे यांनी केले. ते सय्यद सुभान यांच्या टी स्टॉल व अल्पोहार हाँटेलचे उद्घाटन करतांना बोलत होते. 

      शहरातील नगर परिषद जवळ सय्यद सुभान या दिव्यांग व्यक्तीने आपल्या  अपंगात्वावर मात करुण सय्यद सुभान याने स्वकर्तुत्ववार न्यू इंडिया टी स्टॉल व अल्पोहार या व्यावसायची सुरुवात केली आहे. याचे उद्घाटन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. संतोष मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नगरसेवक बाळु लड्डा, रवि मुळे, शंकर कापसे, रणजीत रायभोळे, संजय घोबाळे, सचिन व्हावळे, साजन लोहिया, दत्ता ताटे, अय्युबभाई काकर, आकाश घोबाळे, सुनील घोबाळे व इत मान्यवर उपस्थित होते. अंपगातुन जगण्याची झुंज आणि जिद्द ही अपंगत्वा मुळे सम्पू शकत नाही हेच सय्यद सुभान या आमच्या दिव्यांग बंधुने दाखवून सर्व दिव्यंगा व्यक्तिना संदेश दिला आहे.  नवीन व्यावसायाचा शुभारंभ करणाऱ्या सय्यद शुभान याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

No comments:

Post a comment